- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 30 जनवरी 2018

आगामी शिवजयंती निमित्त शिव सप्ताहाचे आयेजन
--------------------------------------------------------
जय भवानी मित्रमंडळ करणार भव्य प्रमाणात शिव जन्मोत्सव साजरा
--------------------------------------------------------
सोनपेठ (राजेश खेडकर)
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी येथील जय भवानी शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने सोहळ्या  निमित्त शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लोक जन कल्याणा करता  सामाजीक, शैक्षणिक,व संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात येनार आहेत. या कार्यक्रमात सोनपेठ शहर व परीसरातील तसेच तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होऊन  या कार्यक्रमाचा लाभ घेन्याचे आवाहन समितीने केले आहे.

कार्यक्रमाची रूप रेषा खालील प्रमाणे असनार आहे.

दि.१३.०२.२०१८ मंगळवार रोजी सायंकाळी ६.०० वा वक्तृत्व स्पर्धा.
दि. १४.०२.२०१८ बुधवार रोजी सायंकाळी ६.०० वा. गीत गायन स्पर्धा.
दि.१५.०२.२०१८ गुरवार रेजी सकाळी १०.३० वा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
दि. १५.०२.२०१८ गुरवार रोजी सायंकाळी ६.०० वा कविसंमेलन.
दि. १६.०२.२०१८ शुक्रवार रोजी सकाळी ११.३०वा विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा. या  कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. विठ्ठल भुसारे सर (उप. शिक्षणाधिकारी परभणी)
दि. १७.०२.२०१८ शनिवार रोजी सायंकाळी ६.०० वा शेतकरी मार्गदर्शन मेळावा. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचक अण्णा तिडोळे लातुर ( शेंद्रीय शेतीचे अभ्यासक तथा काळी आई वाचवा अभियाना चे प्रमुख हे असतील.
दि. १८.०२.२०१८ रविवार रोजी सायंकाळी ६.३० वा नृत्य स्पर्धा.
दि. २०.०२.२०१८ मंगळवार रोजी सकाळी ९.०० वा मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असुन सायंकाळी ४.०० वा. शिव प्रतिमेची मिरवणूक निघेल. हे सर्व कार्यक्रम अहिल्याबाई होळकर चौक सोनपेठ ता. सोनपेठ जिल्हा परभणी  येथे होणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय भवानी मित्र मंडळ सोनपेठचे अध्यक्ष बळीराम काटे व सदस्यांनी करून अधिक माहिती साठी 9604242473 व 9545901243 या मोबाईल नंबरवर संपर्क साधन्याचे आवाहन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें