आपत्ती व्यवस्थापनासाठी खंबीर मनोधैर्य आवश्यक- जिवराज डापकर
------------------------------
सोनपेठ(राजेश खेडकर)
येथिल कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळेचे आयोजन रा. से.यो. व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनपेठचे तहसिलदार जिवराज डापकर हे होते. याप्रसंगी बोलतााना आपत्ती व्यवस्थापन करताना गोंधळून न जाता मनोधैर्य खंबीर ठेऊन निर्णय घ्यावेत असे सांगीतले.
सोनपेठ तालुक्यातील जनतेला आपत्ती व्यवस्थापना बाबत प्रशिक्षण देण्यासाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी ७२ जनांनी सहभाग घेतला होता.
आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन व व्यवस्थापनासाठीचे विविध प्रात्याक्षिकेही दाखविन्यात आले. प्रकाश शिंदे व सिद्दीकी यांनी गीत गाऊन जनजागरण केले. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार जिवराज डापकर, प्रा. डॉ. मारोती कच्छवे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकप्रमुख लक्ष्मीकांत खळीकर, श्रीमती परवीन, सिद्दीकी, बनकर, नायब तहसीलदार घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. एस. व्ही. रणखांब यांनी तर आभार प्रा. गोविंद वाकणकर यांनी मानले. यावेळी सर्व तलाठी, मंडळअधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशाताई, प्राध्यापक, प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी, प्रा. डॉ. वनिता कुलकर्णी, लक्ष्मीकांत खळीकर, श्रीमती परवीन कौसर, सिद्दीकी, संघदिप बनकर, मुजीब हश्मी, वजाहत बेग, प्रकाश शिंदे, नितीन शेवलकर, काझी आसिफ, यांचा चमू उपस्थित होते.
मंगलवार, 30 जनवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें