- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 22 जनवरी 2018

_*यासेर उर्दू शाळेत आनंद मेळावा  संपन्न*_

गौरव सेवाभावी संस्था सेलु द्वारा संचलित यासेर उर्दू शाळेत दरवर्षीप्रमाने याहीवर्षि आज आनंद मेळावा अतिशय यशस्वीपने संपन्न झाला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा न.प सदस्य रहीम खान खैरुल्ला खान हे होते तर या आनंद मेळाव्याचे उद्घाटन जि.प सदस्य राम खराबे पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथि म्हणून रमेश डख, पत्रकार अबरार बेग, रफीक बेलदार  हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाण जावेद फेरोज़ खान यांनी केले.

या आनंद मेळाव्यामधे यासेर  प्राथमिक आणि माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळून 40 विविध खाद्य पदार्थांचे अतिशय चविष्ट स्टॉल लावले होते ज्याचा आस्वाद संपूर्ण शाळेतील विद्यार्थी, पालकवर्ग तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांनी आस्वाद घेतला आणि भरभरुन स्तुती केली.
या विविधांगणे यशस्वी ठरलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वतः कमाई केल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसुन येत होता.

हा आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद फेरोज़ खान, माध्यमिक शाळेची मुख्याध्यापिका कासमी टि.एस. , अंसारी ज़हीर, फ़ज़ल सिद्दीकी, सय्यद खिज़र, सय्यद ईमरान, सय्यद अज़ीम, सय्यद अमन आदींनी परिश्रम  घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें