मराठवाडा साँफ्टबाँल लीग स्पर्धेत बीड जिल्हा विजेता तर पाली फेन्ड्रस क्लब उपविजयी.
परभणी (समशेर खान)महाराष्ट्र राज्य साँफ्टबाँल संघटनेच्या मान्यतेने व परभणी जिल्हा साँफ्टबाँल संघटनेच्या वतीने परभणी येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परभणी येथे दि.२१ जाने २०१८रोजी मराठवाडा लिग स्पर्धेत बीड जिल्हा विजेता, तर पाली फेन्ड्रस क्लब उपविजयी व तिसऱ्या स्थानावर लातूर जिल्हा संघानी बाजी मारली.
अंतिम फेरीत बीड वि. पाली फेन्ड्रस क्लब दरम्यान कडवी झुंज होऊन 3 होमरन नी बीड संघ विजेता ठरला यात श्रीनिवास सानप ,कर्णधार नाना साबंळे, यांच्या उत्कृष्ट खेळातून रोख ११ हजार रू चे योगेश बरदाळे (मधुर भोज )यांचे पारीतोषिक व चषक पटकावले.
उपविजयी पाली क्लब रोख ७ हजार रू चे परभणी जि.प.सभापती अशोक काकडे यांच्या वतीचे पारीतोषिक व चषक पटकावले. तिसऱ्या स्थानावर लातूर जिल्हा संघाने रोख ५ हजार रू चे कुष्णा कटारे यांचे पारीतोषिक व चषक पटकावले,
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू प्रेम झांजर (बीड), बेस्ट कँचर नारायण झिप्रे(लातूर), बेस्ट पिचर महादुरे आकाश (बीड) यांना रोख प्रत्येकी 2 हजार रू व चषक , कै .शेषराव माळवे यांच्या स्मरणार्थ ( इंद्रधनुष्य सेवाभावी संस्था सेलू) वतीने देण्यात आले.
याप्रसंगी डॉ.दत्त प्रसाद वास्कर ,(संशोधक व.ना.कु.म.वि. परभणी)
मारोती बनसोडे (जि.प.सदस्य ) सुरेश घुमरे प्रा.डॉ. मिनानाथ गोमचाळे, जेष्ठ पत्रकार राजा पुजारी, राज्य सहसचिव प्रा.रमाकांत बनसोडे, प्रा.बालाजी वाघ,योगेश बरदाळे, कुष्णा कटारे, कैलास माने,आदी मान्यवर हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
स्पर्धेचे प्रास्ताविक
रणजित काकडे, तर सुत्रसंचलन प्रा.नागेश कान्हेकर यांनी केले,आभार प्रदर्शन गणेश माळवे, यांनी मानले.
स्पर्धेस पंच म्हणून अक्षय येवले (जळगाव), अविनाश आघाव , श्रीकांत पांडे, रंगनाथ चोपडे, दिपक काळे, श्रीराम जाधव, रवी गांवडे, सुबोध वीर, स्नेहा धोबाळे यांनी काम पाहले.
स्पर्धा यशस्वी ते साठी आयोजन समितीचे सचिव प्रा.प्रसेन्नजित बनसोडे, सतिश नावाडे, ओंकार खोत,अंगद सुतारे, गणेश दिक्षीत, डॉ. सचिन चव्हाण, संदिप तिवारी.बाबुराव गायकवाड, परिश्रम घेत आहेत.
मराठावाडा साँफ्टबाँल लीग स्पर्धेच्या विजेता बीड जिल्हा संघास चषक व ११ हजार रोख बक्षीस देते वेळेस जि.प.सदस्य मारोती बनसोडे, डॉ. दत्तप्रसाद वास्कर, सुरेश घुमरे, प्रा.रमाकांत बनसोडे, योगेश बरदाळे, प्रा. प्रसेन्नजित बनसोडे, कैलास माने, रणजित काकडे, गणेश माळवे, आदी उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें