- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 11 जनवरी 2018

कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन सजरा
---------------------------------------------------------------
प्रा.गोविंद वाकणकर यांनी वाढदिवसा निमित्त केले ग्रंथदान
----------------------------------------------------------
सोनपेठ (राजेश खेडकर)
येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात सध्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा होत आहे. यानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. काल दि.१०जानेवारी रोजी प्रा.हनुमान व्हरगुळे यांचे व्याख्यान व कवी राजेश रेवले यांचे कविता सादरीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे क्रिडा संचालक प्रा.गोविंद वाकणकर यांनी वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयास ग्रंथ भेटी दिली. यावेळी प्राचार्य डॅा.वसंत सातपुते यांनी त्याचे स्वागत केले. तर वाढदिवसा निमित्त ग्रंथालयास पुस्तके भेट देण्याची परंपरा कायम राखल्याबद्दल ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने प्रा.वाकणकर यांचे अभिनंदन  केले.

1 टिप्पणी: