मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा होत आहे उत्साहात साजरा
----------------------------------------------
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात या निमित्त नवनविन उपक्रमाचे आयोजन
----------------------------------------------
सोनपेठ (राजेश खेडकर)
येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात दि. १ ते १५ जानेवारी २०१८ दरम्यान भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा होत आहे. तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने साहित्यिक सावित्रीमाई फुले भित्तीपत्रकाचे प्रकाशन प्राचार्यांच्या हस्ते करून या ऊपक्रमांची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर दररोज नवनविन उपक्रम या निमित्त राबविले गेले आहेत.
दि.१० जानेवारी २०१८ रोजी प्रा.हनुमान व्हरगुळे यांचे व्याख्यान व कवी राजेश रेवले, नैकोटकर यांच्या काव्यवाचनाचे आयोजन मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.वसंत सातपुते होते तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रा.सुरेश मोरे, प्रा.हनुमान व्हरगुळे, कवी राजेश रेवले व प्रा.डॅा.बा.मुं. काळे आदी होते.
याप्रसंगी कवी श्रीकांत देशमुख यांच्या साहित्य अकादमी पुरस्काराचे निमित्त साधून "गौरव बळिवंताचा" व दिवंगत लेखक अरूण साधू यांच्या लेखनाचा परामर्ष घेणारे "साहित्य सिंहासन हरवले" हे दोन भित्तीपत्रक मराठी विभागातील बी.ए. प्रथम वर्षाच्या मयुरी ऊबाळे, शितल सोळंके व अमृता कदम, राधिका बहादूर या विद्यार्थीनींकडून बनवले, त्याचेही अनावरण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
त्यानिमित्ताने बोलत असतांना प्रा.व्हरगुळे यांनी जागतिकिकरणाच्या रेट्यामुळे कुठलीच भाषा आपले मूळ रूप जपू शकली नाही. जोपर्यंत बोलणारा माणूस ती भाषा वापरतो तो पर्यंत तिच्या भवितव्याची काळजी करण्याचे कारण नाही. भाषणाच्या शेवटी त्यांनी एक सशक्त आशयगर्भ कविता सादर केली.
कवी राजेश रेवले यांची आईविषयीची...
माय बोंडं, फुलं, पातं
माय कापसाची वातं
एक आशा फुलविती
माय बापाच्या मनात
ही कविता दाद घेवून गेली. सोबतचं "काळ्या आईची सेवा। माझा हरिपाठ आहे। मी शेतकरी आहे। माझा कणा ताठं आहे" या कवितेने शेतक-यांची दशा व दिशा सांगीतली. अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते यांनी भाषा व भाषेचे स्वरूप सांगून माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासात असलेले भाषेचे महत्वपूर्ण स्थान स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी आवर्जुन ऊपस्थित असलेले सा.सोनपेठ दर्शन चे संपादक तथा पत्रकार किरण स्वामी यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॅा.सा.द.सोनसळे यांनी, सूत्र संचालन प्रा.सखाराम कदम यांनी तर आभार प्रा.डॅा.बा.मुं.काळे यांनी मानले.
गुरुवार, 11 जनवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें