- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 11 जनवरी 2018

विटा (ता.पाथरी) येथे ऊस व कापुस परिषद संपन्न
----------------------------------------------
थकीत ऊस बिलासाठी आंदोलन करण्याची घोषणा
----------------------------------------------

सोनपेठ (राजेश खेडकर)
दि .१० जानेवारी रोजी मौजे विटा येथे आयोजित ऊस व कापुस परिषदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या वेळी थकीत ऊस बिलासाठी आंदोलन सुरू करण्याची घोषणा ही करण्यात आली.
     परीसरातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विटा बु येथे शेतकरी संघटनेच्या वतीने दि १० रोजी ऊस व कापुस परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परीषदेचे उद्घाटन उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. या वेळी अॅड. अजय तल्हार निर्मित "दिशा" या लघुपटाचे प्रदर्शन ही करण्यात आले. परीषदेचे स्वागताध्यक्ष अॅड. शिवाजी हारकाळ यांनी आलेल्या शेतकऱ्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. या परीषदेत माधव हारकाळ, अमरदिप नागुरे व सोमनाथ नागुरे या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले तर निमंत्रक सुधीर बिंदु यांनी परीषद आयोजित करण्यामागची भुमिका स्पष्ट केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कारखानदांची प्रचंड दहशत असुन आपला ऊस कारखानदारांनी न्यावा यासाठी शेतकरी धडपड करत असतो; ऊस जाईल की नाही या मुळे शेतकरी धास्तावलेल्या अवस्थेत आहे या शेतकऱ्यांना हिम्मत देण्यासाठी या परीषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगुन उस उत्पादक सर्व शेतकऱ्यांचा ऊस जाईल असे अश्वासक वक्तव्य केले. परीसरातील कारखान्यांच्या थकलेल्या बिलासाठी शेतकरी संघटना आंदोलन उभारणार असल्याची घोषणा ही यावेळी केली. विज महामंडळाच्या विरोधात शेतकरी संघटना ग्राहक मंचात जाणार असुन विज तोडलेल्या शेतकऱ्यांनी विज मंडळास विहीत नमुन्यातील नोटीस द्यावी असे आवाहन केले. कापसाचे कुठलेही अनुदान शेतकऱ्यांना मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी या विरुद्ध रस्त्यावर यावे तसेच कापसाचे नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळावे यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या वेळी परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिध्देश्वर गिरी यांनी केले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें