अंतर्गत ज्ञान प्राप्त झाल्यास बाह्य ज्ञान सहज प्राप्त होते - ह.भ.प . निवृत्ती महाराज इंदोरीकर
अजय बोराडे
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि. 3, मानवी देह एकदाच मिळतो त्याचा सदुपयोग होणे गरजेचे असतांना मायामोहाच्या जाळयात मानवाला जगण्याचा अर्थ अद्याप ही कळला नाही असे स्पष्ट करीत यासाठी मानवाला अंतर्गत ज्ञान प्राप्त होणे महत्त्वाचे आहे अंतर्गत ज्ञान प्राप्त झाल्यास बाह्य ज्ञान सहज प्राप्त होते असे प्रतिपादन ह.भ.प . निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.
माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मंगळवार ( दि.2) रोजी ह.भ.प . निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे व संचालक सतीश ताठे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पाटील,संचालक दामोदर गव्हाणे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, तालुकाध्यक्षा सीमा गव्हाणे,खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे,शांतीलाल अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ह.भ.प. इंदोरीकर महाराज म्हणाले की, गरीब आणि श्रीमंत हे मानव निर्मित दर्जा असून मानवाचे कर्म हे माणसाचा दर्जा ठरवतात. युवकांनीं छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा व व्यसनापासून दूर राहून आई वडिलांची सेवा करावी तसेच शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड देवून जोड धंद्यांवर भर द्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमास भाविकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें