*होली फेथ इंग्लिश स्कूल तर्फे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सिल्लोड येथे भव्य रॅली*
होली फेथ इंग्लिश स्कूल तर्फे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सिल्लोड येथे भव्य रॅली काढण्यात आली. प्रसंगी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद, मावळे तसेच पारंपारिक वेशभूषा केली, ढोल पथक पथक, लेझीम पथक पथनाट्य, भाषण ,जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील गाने आदींचे सादरीकरण रॅलीत करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचे विचार घरोघर जाऊन पोहोचवले यासाठी पालकवर्गाने त्यांचे भरभरून कौतुक केले . या महान विभुतींचा ठेवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा तसेच तो टिकून रहावा हा रॅली मागचा हेतू होता. रॅलीसाठी शाळेचे अध्यक्ष संतोष सोनवणे सर मुख्याध्यापक समाधान सोनवणे सर ,शिक्षक प्रशांत देवगय्या, संतोष राकडे , रवी पाकळ ,सेनसन लिमा, अनिल के एम ,मनोज पी पी ,जॉन्सन आयझॅक ,शिवकुमार वाघ, अजय चव्हाण, ढोरमारे सर, शिक्षिका मोरे अश्विनी, भोपळे अल्का ,वर्षा बिलंगे, जगनाडे जयश्री ,गावंडे मनिषा, अॅन्सी जॉन्सन , गोंगे आशा, ज्योती भागवत, सरस्वती सपकाळ ,अमला के जॉर्ज , वनिता दळवी आदींनी प्रयत्न केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें