- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 जनवरी 2018

शिक्षकांच्या प्रतिनीयुक्त्या रद्दकरून मुळ आस्थापनेवर रूजू होण्याचे आदेश .
शिक्षण सभापती सौ भावनाताई नखाते यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीच्या बैठकीतील निर्णय.
शिक्षणाधिकारी (प्रा ) आशा गरूड यांना रुजू करून घेण्यास नकार
शिक्षण विस्तार व उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती चा निर्णय आठ दिवसात .
परभणी (जिल्हा प्रतिनिधी )
                शिक्षकांच्या ईतर कार्यालयात असलेल्या सर्व प्रतिनीयुक्त्या रद्द करून त्या शिक्षकांना मुळ आस्थापनेवर रूजू करून घेण्यासह पदोन्नती व चटोपाध्याय निवड श्रेणी ची प्रलंबीत  प्रकरणे तात्काळ निकाली काढणे तसेच शिक्षणाधिकारी (प्रा)आशा गरूड यांना रूजू करून घेण्यास नकार असल्या बाबत चा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला .
                    जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ भावनाताई अनिलराव नखाते यांचे अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात  24 जानेवारी रोजी शिक्षण समितीची बैठक घेण्यात आली .यावेळी महत्वपुर्ण विषयावर चर्चा होवुन ठरावास मंजुरी देण्यात आली आहे .
                       सदरील बैठकित शिक्षण विस्तार अधिकारी व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांचे पदोन्नती बाबात आठ दिवसाच्या आत निर्णय घ्यावा .तसेच शालेय पोषण आहाराची बिले गटशिक्षणाधिकारी यांनी दरमहा १० तारखेला परभणी येथे शालेय पोषण आहार विभागप्रमुख यांना देणे .जिल्हा परीषद शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परीषद शाळेतच करावा .शासनाने १० विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करणे बाबत चा ठराव वरिष्ठ कार्यालयास  संमत करणे .तसेच कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालेल्या वादग्रस्त शिक्षणाधिकारी (प्रा ) आशा गरूड यांना रूजू करून घेऊ नये .शालेय व्यवस्थापन समितीची बैठक प्रत्येक शाळेत दरमहा १२ तारखेला घ्यावी .आर टि ई निकषानुसार विषय निहाय शिक्षकांची रिक्त पदे भरणे बाबत वरीष्ठ कार्यालयाला ठराव पाठवणे  यासह रिक्त शिक्षकांचे पदे भरतांना  अनुकंपा तत्वावरील शैक्षणिक आहर्ता पुर्ण करणार्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे असे महत्वपुर्ण ठरावास मंजुरी देण्यात आली या बैठकीस
सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी बि .आर.कुंडगीर शिक्षण समिती सदस्य अजय चौधरी ,पार्वती शंकरराव वाघमारे , सुषमा गोविंदराव देशमुख , विशाखा विश्वनाथ सोळंके ,उमा रंगनाथ वाकनकर ,स्विकृत सदस्य नारायण जाधव ,राधेश्याम वाढवे  यांची उपस्थीती होती .
       याबैठकीस  सर्व गटशिक्षणाधिकारी ,शालेय पोषण आहार ,सर्व शिक्षा आभियानातील व बांधकाम विभागातील सर्व प्रमुख आधिकारी यांची उपस्थीती होती .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें