जि.प.प्रा.न.१ ऊर्दू शाळेत कॅन्टीन डे साजरा करण्यात आला,
वेगवेगळ्या स्टाॅल लावण्यात आले होते
भोकरदन प्रतिनिधी : शेख सलिम
शहरातील जि.प.प्रा. शाळेत कॅन्टीन डे चे आयोजन करण्यात आले होते सदरील कॅन्टीन डे चे उदघाटन हम्दु चाऊस यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मुख्तार कादरी उपाध्यक्ष शेख मुख्तार केंद्र प्रमुख आर.एच.सोनवणे घायळ सर तसेच महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष इसरार पठाण ता.अध्यक्ष शेख सलिम अफजल कुरैशी शेर खान सय्यद सलिम उबेद चाऊस जफर सर गाढ़ेकर सर वाजेद सर राहुल देशमुख प्रतीक देशमुख रमेश जाधव मोहम्मद चाऊस आदि उपस्थिति होती सदरील कॅन्टीन डेचे उद्घाटन सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान करण्यात आले यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वीस स्टाॅल लावले होते पालकांनी आपल्या मुलांना चागले कार्य करण्या बद्दल कौतुक करावे आपल्या पाल्याचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे असे मुख्तार कादरी यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विषेश म्हणजे कॅन्टीन डे मध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता आणि चागले प्रकारे खाऊ पदार्थाचे वीस स्टाॅल लावुन अनेकांची मने जिंकली आहेत या वेळी पालकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्यध्यापिका फलक नाज मैडम मुश्फिक फातेमा जि.प.प्रा. न.1 शिक्षक व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले होते व आज २६ जानेवारी रोजी कैंटिन डे मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिंना शालय समितीचे अध्यक्ष मुख्तार कादरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें