सोनपेठ शहरातील मालमत्ता अधिकृत करण्यासाठी निवेदन
------------------------------------------------------------
सोनपेठ (प्रतिनिधी) महसुल प्रशासनाने सोनपेठ शहरातील हजारो मालमत्ता धारकांना विना परवाना अकृषीक वापर केल्या प्रकरणी नोटीसा बजावल्या होत्या. सदर मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्ता अधिकृत करुन देण्यासाठी शेतकरी संघटनेचे श्री.सुधीर बिंदु यानी प्रयत्न चालविले आहेत. उपविभागीय अधिकारी पाथरी मा.श्री चुन्नीलाल कोकणी व श्री. जिवराज डापकर तहसीलदार सोनपेठ यांना निवेदन देऊन प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकतीच केली आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें