- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 8 जनवरी 2018

पिशोर पोलिसांनी केला खुणाचा पर्दा फाश..

अनैतिक संमधातुन करण्यात आला होता खून सपोनि अभिजीत मोरे याच्या तापसात झाले सिध्द... आरोपी अतकेट.

२४ते २५ डिसेंबर रोजी एकघर पाडळी शिवारात घड़लेल्या घटनेतील मयताची ओळख पटली.


दिनांक २५ डिसेंबर २०१७ रोजी पिशोर पोलीस ठाणे गुरन ४५७/२०१७ कलम ३०२,२०१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील अनोळखी पुरुषाचा अज्ञात आरोपितांनी अज्ञात कारणासाठी गळा आवळून, त्यास जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत पिशोर हद्दीतील एकघरपाडळी शिवारातील सुभाष तुळशीराम साबळे यांचे शेत (गट नंबर ५५) मध्ये अंदाजे ३० ते ३५ वयोगट व साडेपाच फूट उंचीच्या शेतात पडलेल्या मक्का च्या चाऱ्यात पोत्यात बांधून आणून फेकून पेटवून दिले होता.
दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी सदरचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आले होते परंतु मयताचा चेहरा ओळखणे कठीण झाले होते,आरोपितांनी खूप चलाखीने शांत डोक्याने सदरचा गुन्हा केला होता सदर घटनेची खबर मिळताच स्थागुशा चे पोलीस निरीक्षक श्री सुभाष भुजंग यांनी घटनास्थळी आपल्या पथकासह भेट दिली व बारकाईने निरीक्षण करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी योग्य ते आदेश दिले
गुन्ह्यातील अज्ञात आरोपी व मयताची ओळख पटविणे साठी औरंगाबाद जिल्हा व आसपासच्या सर्व जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्ती बाबत माहिती गोळा करण्यात आली मयता जवळ मिळून आलेल्या वस्तू हातातील अंगठ्या,दोरा, कमरेतील करदोडा व त्यास असलेल्या लाचकन्ड, चाव्या, पांढरी कवडी व अंडर पॅन्ट चा जळालेला अर्धवट तुकडा इत्यादी वरून अशा वर्णनाचा इसम कोठून बेपत्ता आहे का याबाबत तपास करण्यात आला
दिनांक ३ जानेवारी २०१८ रोजी पोस्टे पिशोरला निंभोरा ता. कन्नड येथील देवमन विठ्ठल सोनवणे वय ४५ हे दिनांक २५ डिसेंबर पासून बेपत्ता असल्या बाबतची तक्रार प्राप्त झाली .
पोस्टे पिशोर चे सपोनि अभिजित मोरे हे वरील गुन्ह्याचे तपासीक अंमलदार असून देवमन सोनवणे हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी हिने उशिराने दाखल केल्याने एकघर पाडळी येथे मिळून आलेले अर्धवट जळालेले प्रेत हे देवमन सोनवणे याचेच तर नाही? असा कयास लावून स्थागुशा चे पोउपनि कापुरे, पोह मुळे, राख, देशमुख, पोना शेख नदीम, पोकॉ बाबा नवले, बकले, तसेच सायबर सेल चे पोउपनि विकास हजारे, रवींद्र लोखंडे, योगेश तरमळे व जीवन घोलप, योगेश दारवनटे, गजानन बनसोड तसेच पिशोर पोलिस ठाण्याचे सपोनि अभिजित मोरे व उपनिरीक्षक जयराज भटकर, पोह संजय देवरे, किसन गवळी, पोना सुनील ढेरे, देवकर यांनी गोपनीय माहिती काढली असता तपासा अंती असे निष्पन्न झाले की देवमन सोनवणे याची पत्नी व पंडित कायंदे रा वासडी यांच्यातील अनेतिक सम्बधात देवमन हा अडसर ठरत असल्याने पंडित व देवमनची पत्नी यांनी अगोदर पासून कट रचला होता व ठरल्या प्रमाणे दिनांक २४ डिसेंबर च्या रात्री अकरा साडे अकरा वाजता त्याच्याच घरासमोर देवमन हा झोपीत असताना पंडित कायंदे याने व गणेश शिंदे रा जांभई ता. सिल्लोड हमु गुलमोहर कॉलोनी औरंगाबाद याच्या मदतीने दोरीने गळा आवळून खून केला व त्याचे प्रेत पोत्यात टाकून पंडित व गणेश याने दुचाकीवर प्रेत नेऊन एकघर पाडळी शिवारात नेऊन २५ डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजता मक्क्याच्या चाऱ्यात टाकून पेटवून दिले व तेथून पळून काढला.
सदर गुन्ह्यात मयत देवमन याची पत्नी ही सह आरोपी आहे.
पंडित कायंदे यास पिशोर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी व गणेश शिंदे यास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी शिताफीने ताब्यात घेऊन सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर कामगिरी ही मा. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह ,अपर पोलिस अधीक्षक उज्वला बनकर,उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग,उपनिरीक्षक सचिन कापुरे, विलास हजारे ,गणेश मुळे, विठ्ठल देशमुख, पो.ना. नदीम शेख,पो.कॉ. बाबासाहेब नवले,जीवन घोलप,योगेश तरमाळ व पिशोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे उपनिरीक्षक जयराज भटकर, संजय देवरे,सुनील ढेरे, किसन गवळी, देवकर यांनी ही कामगिरी पार पाडली...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें