निवासी मतिमंद विद्यालय सिल्लोड येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी .
सिल्लोड.प्रतिनिधी.(अजय बोराडे) 12 जानेवारी 2018 रोजी निवासी मतिमंद विदयालय सिल्लोड येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी श्रीमती एस . एच. जाधव यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्या बद्दल माहिती दिली .श्री. एस .जी चाबुकस्वार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्या बद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांना जयंती दिनी बिस्कीट व चॉकलेट देण्यात आले. यावेळी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
आशा प्रकारे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें