विद्यार्थ्यांचा खदानीत मृत्यु
अपघात की घातपात?
जालना, प्रतिनिधी ः गेल्या तीन दिवसांपासुन रहस्यमय रित्या गायब झालेल्या 16 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा खदानीतील पाण्यावर मृत्यदेह तंरगतांना आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक वृत्त असे की, नविन जालना भागातील शेख रेहान शेख हसन (वय 16) हा जुना जालना भागातील कचेरी रोड वरील उर्दु महाविद्यालयात अकरावी वर्गात कला शाखेत शिकत होता. दि.10 जानेवारी रोजी महाविद्यालयात जातो म्हणुन तो घरातुन निघाला परंतु परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी सदर बाजार पोलिस ठाण्यामध्ये रात्री 10 वा. रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गेल्या दोन दिवसांपासुन रेहान गायब असल्याने त्याच्या नातेवाईकात चिंतेचे वातावरण पसरले होते. आज तिसर्या दिवशी सकाळी मोतीबागेकडील डी.एड.कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या एका खदानीत त्याचा मृत्यदेह तरंगतांना आढळुन आला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचवुन प्रेत बाहेर काढुन उत्तरीय तपसणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवुन दिले. दरम्यान रेहान याच्या चेहर्यावर उजव्या बाजुस जखमा असल्याने हा अपघात की घात? या दृष्टीने पोलिस तपास करत असल्याचे सांगण्यात येते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें