- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 जनवरी 2018

*पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ  खो-खो स्पर्धेत स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड ची विजेतेपदाची हॅट्रीक.*

सेलू : ( समशेर खान )येथील नूतन महाविद्यालय,सेलूच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नूतन महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ,दि. 5 जाने.     कै.श्रीराम भांगडीया क्रीडा नगरी,नूतन महाविद्यालय मैदान,सेलू येथे पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेच्या साखळी फेरीत  स्वा.रा.ती.म.विद्यापीठ,नांदेड   ने कोल्हापूर, पुणे ,मुंबई विद्यापीठास नमवून  विजेतेपदाची हॅट्रीक केली.

नांदेड विद्यापीठ ने अटितटीच्या रोमहर्षक सामन्यात  1 गुणाने मुंबई विद्यापीठाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.नांदेड संघाच्या वतीने प्रशांत थोरात ने 2:00 मि.संरक्षण करत 2 गडी बाद केला, सुरेश सावंत ने 1:40 मि. संरक्षण करत 2 गडी बाद केले.

मुंबई विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर या संघांचा सामना समान गुण झाल्यामुळे लघुत्तम आक्रमक सामन्यात मुंबई विद्यापीठाने  अवघ्या 30 सेकंदात कोल्हापूर संघाचा गडी बाद करत  उपविजेतेपद पटकावले.शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर  तिसरा क्रमांक, सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे चौथा क्रमांक प्राप्त केला.

*पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठात खोखो स्पर्धेचा समारोप*         
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे  होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.बाबाजानी दुर्राणी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष भावनाताई नखाते, सहायक जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डाँ.जी.बी. कतलाकुटे,परीक्षा संचालक रवी सरोदे,उपकुलसचिव महेश त्रिभुवन,क्रीडा संचालक डाँ.मनोज रेड्डी,माजी आ.हरीभाऊ लहाने, हेमंतराव आडळकर, मुकेश बोराडे, डाँ.प्रदीप देशमुख, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे,पवन आडळकर,न.प.सदस्य मुश्ताक अहमद ,डॉ.चंद्रकांत सातपुते,संस्थेचे सचिव डी.के.देशपांडे, सहसचिव डाँ.व्ही.के. कोठेकर,अजीज खान पठाण,राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे,डॉ.दिपक बच्चेवार,डॉ.यशवंत कल्लेपवार,नंदकुमार बाहेती,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त यु.डी.इंगळे,न.प.सदस्य मनिष कदम, वाहेद खाँन,रणजीत गजमल यांची उपस्थिती होती.
             अटीतटीच्या अंतिम साखळी  सामन्यात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड आणि मुंबई विद्यापीठ या दोन्ही संघांनी रोमहर्षक खेळ पाहण्यासाठी पाच हजार प्रेक्षकांची चित्त हिरावून घेतले. जेव्हा नांदेड विद्यापीठ विजयी घोषित झाले तेव्हा विजयी स्पर्धकांसह प्रेक्षकांनीही मैदानात ताल धरला. मान्यवरांच्या हस्ते विजयी संघांना वैयक्तिक व सांघिक  चषक, पदक व रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकाचे मानकरी उत्कृष्ट संरक्षण दुर्देव साळुंखे (मुंबई विद्यापीठ), उत्कृष्ट आक्रमक पियुष घोलप,अष्टपैलू खेळाडू सुरेश सावंत (नांदेड विद्यापीठ) ठरले. नगराध्यक्ष विनोदराव बोराडे,साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, त्र्यंबकराव बोराडे, किशोर जोशी, मुश्ताक अहमद यांनी रोख रक्कमेची पारितोषिक देऊन विजेत्या संघांना प्रोत्साहीत केले.क्रीडा संचालक प्रा.कमलाकर कदम यांनी स्पर्धेचा अहवाल मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाँ. राजाराम झोडगे,प्रा.सुभाष बिरादार , प्रा.भाग्यश्री धामणगांवकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्राचार्य डाँ.शरद कुलकर्णी यांनी केले.स्पर्धा निरीक्षक प्रशांतकाका पाटणकर,पंच प्रमुख डॉ. युसूफ पठाण, विरेंद्र भुबड, प्रभाकर काळे ,रणजित जाधव, राम चोखट, प्रकाश टाकळे, अँड.महेश ढोंबळे, अमोल मुरकुटे हे काम पाहत आहेत.
स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य डाॅ.शरद कुलकर्णी, उपप्राचार्य यादव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.संतोष दंडवते,गिरीष लोडाया, प्रा.एल.एच. काळे, डॉ.प्रकाश कंठाळे ,  प्रा.के.के.कदम, प्रा.नागेश कान्हेकर, प्रा.माधव शेजुळ,डॉ.एस.आर. धोंडगे, डी.डी. सोन्नेकर , गणेश माळवे,डॉ.नागनाथ  गजमल, डॉ.व्ही.एस.माने,डॉ.महेश वाखरकर,बळिराम लाड,डॉ.अंकुश सोळंके,डॉ.तातेराव केंद्रे,प्रा.शफीक कुरेशी , गोपाळ पिंपळगांवकर ,प्र.शिवराज घुलेश्वर,बाबासाहेब चारठाणकर,राजेश राठोड,चंद्रशेखर नावाडे,सतिश नावाडे,सर्जेराव लहाने,प्रविण लोया, बिपिन मंत्री,सुरेश हिवाळे, प्रा. शाम गरूड,प्रा.मोहन पाटील,प्रा. हेमचंद्र हडसनकर, प्रा.गुलाब शेख,अविनाश सुत्रावे,रविंद्र कदम ,पी.ए.देशपांडे तसेच सर्व समितील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

++पश्चिम विभागिय खो-खो स्पर्धा स्वा.रा.ती.म.नांदेड विद्यापीठ विजेता संघ, दुसऱ्या फोटो मुंबई विद्यापीठ उपविजेता संघा समावेश मान्यवर.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें