आष्टी येथे बेलदार समाजसेवा मंडळाच्या मेळाव्याचे आयोजन !
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
बेलदार समाज सेवा मंडळाच्या वतीने मौजे आष्टी ता.परतुर जि.जालना येथे दि. ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता एक दिवसीय बेलदार समाजाचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन यात समाजहिताबद्दल चर्चा तसेच पुढिल नववर्षाची समाजकार्याची रुपरेषा ठरविण्यात येणार आसुन आष्टी येथे नवनिर्वाचित अध्यक्षासह कार्यकारीनीची निवड करण्यात येणार आहे व समाजसेवा मंडळाच्या शाखेचे उदघाटन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलदार समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.सय्यद जुनेद हे राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन सा.राज घोषणाचे मुख्यसंपादक तथा बेलदार समाजाचे महाराष्ट्र संघटक सय्यद अबरार बेलदार,बेलदार संघटनेचे प्रवक्ते आडगळे साहेब,मराठवाडा संघटक मुस्तखीम बेलदार आदि उपस्थीत राहणार आहे.तरी या कार्यक्रमास मोठ्याप्रमाणात उपस्थीत राहण्याचे आवाहन शाखा आष्टी येथील बेलदार समाज बांधव व महाराष्ट्र संघटक अबरार ईलाही बेलदार यांनी केले आहे.
Tezznews24 web news channel.
Contact.8888375846
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें