वाचन लेखन चळवळ वाढवल्या बद्दल शरद ठाकर यांचा सन्मान
सेलू : येथील शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, उपक्रमशिल शिक्षक शरद ठाकर यांचा रविवार ता.०७ रोजी मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी औरंगाबाद येथे बोधी ट्री एज्युकेशन फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने जीवन गौरव मासिकाचे सहसंपादक म्हणून उत्कृष्ट कार्य व वाचन लेखन चळवळ वाढवल्या बद्दल पुस्तक,मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वालूर येथील शांताबाई नखाते आश्रम शाळेतील सहशिक्षक राजेंद्र पाटोळे यांचा जीवन गौरव मासिकाने घेतलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर राजीव गांधी हायस्कूल,ताडबोरगाव ता.मानवत येथील राजीव गांधी हायस्कूलमधील सहशिक्षक शेख महेमुद अमिनोद्दिन यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ.देवकर, भास्कराचार्य प्रतिष्ठानचे सचिव प्रा.सोमनाथ वाघमारे, रामदास वाघमारे,दिगंबर शिंदे,राजश्री पल्लेवाड यांची उपस्थिती होती. सन्माना बद्दल सर्जेराव लहाने,डॉ.अशोक पाठक,रमेश नखाते,सुरेश हिवाळे,एकनाथ जाधव,दिगंबर रोकडे, किशन कटारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
उपक्रमशिल शिक्षक शरद ठाकर यांचे अभिनंदन 📖🙏
जवाब देंहटाएं