- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 जनवरी 2018

भाजप-शिवसेनेच्या सरकारला सत्तेची नशा चढलीय.- अजितदादा पवार.

समशेर खान
प्रतिनिधी.सेलु.
राज्यातील सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे, राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी ठरली आहे. तसेच शेतकरी, कामगार, तरुण व सर्वसामान्य जनतेची कामे करण्याची सध्याच्या सरकारकडे इच्छाशक्तीच उरली नाही. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवीले, महागाई वाढ, बेरोजगारीचे प्रमाण जास्त, शेतकऱ्यांना दिलासा नाही अशा प्रकारे सर्वच स्तरात अस्वस्थता दिसून येत आहे.
सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केलेल्या या सरकारला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल सेलू येथील #हल्लाबोल सभेत दिला.

सध्या सर्वत्र सरकारविरोधात घोषणाबाजी होते आहे. संतापजनक वक्तव्ये केली जात आहेत. लोकांच्या या प्रतिक्रिया स्वयंस्फूर्तीने येत आहेत. हा संताप एकवटून त्याला येणाऱ्या अधिवेशनात आम्ही नक्कीच वाचा फोडू आणि हा आवाज संघर्षात परावर्तित होईल, अशा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धंनजय मुंडे म्हणाले, की आपण किती महागाई सहन करणार? असा सवाल करत हा रोष व्यक्त केला पाहिजे आणि त्यासाठीच राष्ट्रवादीचा हा हल्लाबोल आहे, असे ते म्हणाले.
आता तहसीलदाराकडे उत्पन्नाचा दाखला घ्यायचा असेल, तर आधी पतंजलीची उत्पादने घ्यावी लागणार, मगच दाखला मिळेल, अशी खोचक टीका त्यांनी केली. भाजपचे मंत्री हपापल्यासारखे भ्रष्टाचार करायला लागले आहेत. एक मंत्री म्हणतात, ‘वर्षभरात सरकार बदलणार घ्या उरकून!’ आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, ‘नवसानं मूल झालं आणि मुके घेऊन मेलं.’ अगदी तशीच अवस्था १५ वर्षांच्या नवसाने सत्ता मिळालेल्या भाजपची झाली आहे. ती सत्ता त्यांना राखता येत नाही, असेही ते म्हणाले.

फसवी कर्जमाफी, शेतीमालाला भाव नाही, कापसाच्या बोन्डअलीची मदत नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. हे सरकारच शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेले आहस. आंदोलने करूनही सरकार वठणीवर येत नसेल तर यापुढे रुमणे हाती घ्यावे लागेल असा इशारा मी यावेळी बोलताना केला आणि सरकार खाली खेचेपर्यंत आपला लढा सुरूच राहील असा विश्वास व्यक्त केला.

या सभेत विधिमंडळ गटनेते जयंतराव पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी मंत्री आ.राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.अमरसिंह पंडित, आ.प्रदीप नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, गणेश दुधगावकर, सुरेश जाधव, सारगंधर महाराज रोडगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुद्धे, सोनाली देशमुख, डॉ.नरेंद्र काळे उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें