- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 जनवरी 2018

*28 जानेवारीला योग्य निर्णय घेऊ – वरपूडकर*

समशेर खान
सेलू/प्रतिनीधी
परभणी येथील माजी मंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री सुरेशराव वरपुडकर यांना सेलूतील मुस्लिम काँग्रेस कार्यकर्त्यांनी 24 जानेवारी, बुधवार रोजी परभणीला जाऊन वरपुडकर यांची भेट घेतली व पुर्वी केलेल्या शहराध्यक्ष निवडीबद्दल फेरविचार करावा अशी आशा व्यक्त  केली व सेलूतील एक हजार मुस्लिम काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी व भ्रमणध्वनी क्रमांकासह निवेदन सादर केले. यावर तोडगा काढण्यासाठी आपण काँग्रेसचे जेष्ठ हेमंतराव आडळकर, काँग्रेसचे नगरसेवक पठाण रहीमखान खैरुल्लाखाँन, बाबा राखे, शहराध्यक्ष पदाचे दावेदार अबरार बेग व इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन 28 जानेवारीला यावर तोडगा काढण्यात येईल असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष वरपुडकर यांनी सांगीतले.
यावेळी काँग्रेसचे नगरसेवक पठाण रहीमखान, बाबासाहेब राखे, हाजी शेख खय्यूम,  शेरखान पठाण, रफीक बेलदार, शेख नफीस, बाबर बेग, शेख रफीक खन्ना, शेख मुकतार आदि मुस्लिम काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणीचे निवेदन सादर केले. व निवेदनात असे नमुद केले की, राजकीयदृष्ट्या पाहता समाज संख्येच्या आधारावर मुस्लिम समाजाची निवड करण्यात यावी अशी विनंती केली. यावर येत्या 28 जानेवारीला योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही वरपूडकर यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें