श्री साई समाधी शतकपूर्ती महोत्सवा निमित्त सोनपेठ येथुन पायी दिंडी चे आयोजन
--------------------------------------------------------------------------------सोनपेठ ते शिर्डी पायी दिंडीचे उद्या प्रस्थान
----------------------------------------सोनपेठ(राजेश खेडकर)
श्री साई समाधी शतकपूर्ती महोत्सवा निमित्त सोनपेठ ते श्री शिर्डी पायी दिंडी चे श्री साई द्वारकामाई परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
पालखी सोहळ्याचे हे पहिले वर्ष आहे. साई पालखी २५ जानेवारी रोजी सोनपेठ येथुन प्रस्थान करणार असुन, दिंडीचे ११ मुक्काम होनार आहेत. पहिला मुक्काम मुदगलेश्वर देवस्थान मुदगल (ता. पाथरी) , शुक्रवार दि.२६ श्री साई मंदिर रेणापुर (ता. पाथरी), शनिवार दि. २७ छोटेवाडी (ता.पाथरी), रविवार दि.२८ माऊली मंदिर माऊली फाटा (ता. माजलगाव), सोमवार दि. २९ सिरसदेवी (ता. गेवराई), मंगळवार दि. ३० गेवराई, बुधवार दि. ३१ धुमेगाव (ता.शेवगांव), गुरूवार दि.०१ घनवट वस्ती (ता.शेवगांव), शुक्रवार दि.०२ कुकाणा (ता. नेवासा), शनिवार दि. ०३ श्री साईनाथ नगर (ता. नेवासा), रविवार दि. ०४ गोंदवणी श्रीरामपुर (ता. श्रीरामपुर) व सोमवार ५ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे पोहोचनार आहे.
या दिंडीचे साईबाबा च्या आर्शिवादाने व्यापक स्वरूप धारन केले आहे. पायी दिंडी साठी मागील पंधरा दिवसा पासुन शहरात जय्यत तयारी सुरू असुन साई रथाची सजावटही अंतिम टप्प्यात आहे. या दिंडीत ज्या साई भक्तांना सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी मो. ९८८१२६३४४३, ९८६०२३०९७१ व ९४२३७३७७८४ येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजन समितिच्यावतीने करण्यात आले आहे. हि दिंडी शहराचे ग्राम दैवत हनुमान चौकातील मारोती मंदिर येथुन उद्या गुरूवार रोजी सकाळी ९ वा. निघणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें