- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 जनवरी 2018

शैक्षणिक कामगिरी निर्देशांक (API) विषयावर कार्यशाळा संपन्न


सोनपेठ(राजेश खेडकर)
चौथ्या विद्यापीठ आनुदान आयोगाच्या सुधारणेनुसार झालेल्या बदलास अनुसरून माहीती देण्यासाठी येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. च्या वतीने महाविद्यालयातंर्गत कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते तर साधन व्यक्ती म्हणून प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील व प्रा. विठ्ठल जायभाये हे होते.
शैक्षणिक कामगिरी निर्देशांक (ए.पी.आय.) या विषयावर चौथ्या विद्यापीठ आनुदान आयोगाच्या सुधारणेनुसार झालेल्या बदलास अनुसरून माहीती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या निर्देशांकात मुल्यांकन पद्धतीमध्ये सूची प्रकार एक व दोन मधील भागावर व तिसऱ्या प्रकारातील संशोधन व इतर बाबीवर प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील व प्रा. विठ्ठल जायभाये यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी शैक्षणिक सुधारणा व आधुनिक बदलाबरोबर सज्ज रहाण्यासाठी नविन माहीती तंत्रज्ञानाचा वापर करावा असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मोहन मिसळ तर आभार प्रा. विकास रागोले यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें