- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 7 जनवरी 2018

*स्मरण*

*सस्नेह निमंत्रण*

*सेलू येथे शिक्षकांसाठी विभागीय कथाकथन स्पर्धा*

सेलू. 

येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात साने गुरुजी कथामाला हेलस ता.मंठा जिल्हा जालना या कै.दत्तात्रय हेलसकर यांनी स्थापन केलेल्या कथामालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्य विभागीय कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी दि.7 जानेवारी रविवार रोजी सकाळी. 10 वाजता पार पडणार आहे.

या स्पर्धेची प्राथमिक जिल्हास्तरीय फेरी 30 जानेवारी ला मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्य़ात यशस्वीपणे पार पडली.यात 155 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.यात प्रथम क्रमांक पटकावणार्या 8 स्पर्धकांना या अंतिम विभागीय फेरीत संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमासाठी मुंबई येथील सुप्रसिद्ध पटकथाकार व गीतकार प्रा.चंद्रकांत शिंदे,परभणी जि.प चे उपशिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारे,सेलूचे गटशिक्षणाधिकारी जयंत गाढे, के.बा.शि.प्र.मं.चे उपाध्यक्ष अॅड. लक्ष्मीकांत सुभेदार,सहसचिव डाॅ.भागचंदजी मालाणी,मुख्याध्यापक आश्रावंती हिवाळे,दत्तात्रय नागरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

तरी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक श्रीमती कल्पना हेलसकर, तसेच संयोजन समितीचे प्रा.सुहास सदाव्रते,बाबासाहेब हेलसकर, योगेश ढवारे, विजय वायाळ,सतीश कुलकर्णी,प्रमोद देशमुख आदींनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें