पूर्णेतील रेल्वे प्रश्न व प्रलंबित मागण्या कडे महाप्रबधक यादव काय घोषणा करतात या कडे पूर्णेकराचे लागले लक्ष
पूर्णा/आज दि 23 रोजी मंगळवारी दक्षिण मध्ये रेल्वेचे महाप्रबधक विनोद कुमार यादव है नांदेड विभागाच्या दौरा वर येत असून ते पूर्णा रेल्वे स्थानकाची ही पाहणी करून जवळजवळ दोन तास पूर्णेत थांबणार असल्याने ते पूर्णेच्या विविध समस्या व मागण्या बाबत काय घोषणा करतात या बाबत पूर्णेकरांचे लक्ष लागले आहे
या बाबत अधिक वृत्त असे कि, दक्षिण मध्ये रेल्वेचे महाप्रबधक विनोदकुमार यादव है परळी मार्गनी सकाळी 10वाजता गंगाखेड येथे येऊन गोदावरी नदीवरील पुलाची स्थितीची पाहणी करून सकाळी 11 वाजता परभणी रेल्वे स्थानकाच्या विविध भागची पहाणी करून दुपारी 12 15 वाजता पूर्णेत दाखल होऊन सव्वा दोन तास ते पूर्णेत थांबून रेल्वे स्थानकावरील क्रुबुकींग लॉबी,कम्युनिटी हाल,विभागीय ट्रेनिग सेंटर यांच्या सह रेल्वेच्या विविध कार्यलयाची तपासणी करणार आहे दरम्यान पूर्णा हे रेल्वेचे मोठे जगशन असून या ठिकाणी रेल्वेची हजारो एकर जमीन असून या ठिकाणी रेल्वेचे विविध कार्यलय व कर्मचारी अधिकारीचे घरे निर्माण करावी,डिझेल शेट, विधुत शेड,प्लांटफार्मची संख्या वाढविणे,स्थलांतरीत कार्यलयाचे कर्मचारी पुन स्थापित करावे, रेल्वेच्या दवाखाना,रेल्वेचा शाळेत शिक्षकाची कमतरता दूर करणे,मालगाडी साठी दुसरा नवीन लाईन टाकणे,चार नंबर ते एक नंबर फ्लॅटफार्म स्वीपट करावी,प्लॅटफार्म चार महिलेच्या शौचालयची व्यवस्था करणे, परभणी ते पूर्णा दरम्यान असलेल्या मिरखेल रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट व एक्स्प्रेस गाडीया तासो ना तास उभे करण्यात येत असल्याने प्रवासीयांची चांगलीच गैर सोया होत असून आशा अनोगदा कारभार नांदेड कंट्रोलचा सुरु आहे या कडे ही लक्ष देणेची गरज आहे अश्या विविध मागण्याची अपेक्षा पूर्णेकर महाप्रबधक विनोद कुमार याच्याशी पूर्णेकर करत असून या सर्व मागणी कडे महाप्रबधक विनोद कुमार काय भूमिका घेतात की आले तसे पूर्णेकरच्या पदरात काय न टाकतात निघून जातात या कडे लक्ष लागले आहे दुसरी कडे महाप्रबधक यादव याच्या दौरा निमित्त त्यांना खुश करण्या साठी सर्व रेल्वे स्थानक कधी न चमकणारे चमकू लागले आहे तर रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलीस कामा लागून फक्त दौरा पुरते अवैध हकर्स वाल्याना बंद करण्या साठी सूचना देण्यात आल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें