शीतकालीन शालेय क्रिडा स्पर्धा चालू
----------------------------------------
शहरासह तालुक्यातील शाळांचे खेळाडू गाजवित आहेत मैदान
---------------------------------------------------------------
सोनपेठ (राजेश खेडकर)
शहर व तालुक्यातील सर्वच शाळेत सध्या शितकालीन क्रिडा स्पर्धा चालू आहेत. जळपास सर्वच शाळेची मैदाने यामुळे फुलुन आली आहेत. विविध क्रिडा प्रकारातील सामने व मुलांनांचा सहभाग पहाण्यासाठी पालकवर्ग सुद्धा मैदानावर उपस्थिती लावत असल्याचे दिसुन येते.
शहरातील जि.प.केंद्रीय कन्या शाळा येथे आज कबड्डी, खो-खो, संगीत खुर्ची आदी स्पर्धा संपन्न झाल्या. शाळेचे मुख्याध्यापक राठोड यांच्या मार्गदर्शनात येथील शिक्षकवर्ग या स्पर्धा यशस्विरित्या पार पाडीत आहेत. तर शहरातीलच श्री महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातही मुख्याध्यापक पी.एल. जोशी व ज्येष्ठ क्रिडा शिक्षक गव्हाणे डी.आर. यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा शिक्षक प्रशांत पारेकर यांच्या सहकाऱ्याने विद्यालयाचे सर्व शिक्षक स्पर्धा यशस्विरित्या पार पाडत आहेत. येथील क्रिडा प्रकारातील सर्व सामने अंतिमटप्प्यात आले आसुन तालुक्यातील वाणीसंगम येथील जि.प.प्राथमिक शाळेत सुद्धा तेथील उपक्रमशिल मुख्याध्यापक डी.के.पवार यांच्या मार्गदर्शनखाली त्यांचे सहकारी शिक्षक क्रिडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडत आहेत.
सर्वच शाळांची मैदाने यामुळे गजबजुन गेली असुन खेळाडु विद्यार्थीसुद्धा खेळ भावनेतुन हार-जित स्विकारीत आहेत. कांही शाळांच्या क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या असुन आनंद नगरीच्या आयोजनाने विद्यार्थ्यांसह गुरुजनांनही स्वादिष्ठ व रुचकर अशा खाद्यपदार्थांची चव चाखन्यास मिळत आहे. एकुणच तालुक्यातील सर्व शाळा शितकालीन स्पर्धांमुळे फुलुन आल्या आहेत.
सोमवार, 22 जनवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें