- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 28 जनवरी 2018

........प्रसंग.........

काल सेलू तालूक्यातील लाडनांद्रा येथे एका खाजगी कार्यक्रमात उपस्थित रहाण्यासाठी गेलो होतो. कार्यक्रम आटोपून परतीचा प्रवास करत असताना रस्त्यात एका बैलगाडीचे चाक निखळले होते. त्या परिसरात आजुबाजूला कुणीच नव्हते त्या बैलगाडीचा चालक एकटाच तो चाक बसवण्यासाठी तारेवरची कसरत करत होता. दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूकही नव्हती. बैलगाडीवाल्या शेतकऱ्याची तारांबळ मला पाहवली नाही. मी तात्काळ माझ्या ड्रायव्हरला गाडी ब्रेक करायला सांगितले. आणि त्या बैलगाडीचे चाक बसवण्यासाठी शेतकऱ्याला मदत केली. खर तर ती मदत फार छोटी होती. आणि या गोष्टीचा गवगवा करून मला माझी पाठ थोपटूनही घ्यायची नाही. पण तुम्ही आम्ही प्रवास करत असताना अश्या कित्येक गोष्टी घडत असतात अश्या वेळी आपण डोळेझाक करून त्या वंचिताना मदतीचा हात देण्याऐवजी निघुन जातोत.परंतु मित्रांनो आपली छोटीशी मदत समोरच्यांना हत्तीचं बळ देऊन जाते. तुम्हाला जर कधी असा प्रसंग आढळून आला तर निश्चितच त्यांना माणूसकीच्या नात्याने मदतीचा हात द्या...... *.. राम पाटील नाना खराबे* (जिल्हा परिषद सदस्य)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें