- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 28 जनवरी 2018

माजी कर्मचाय्रांनी जागविल्या जून्या आठवणी


सेलू: येथील नूतन महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रविवार ता.२८ रोजी महाविद्यालयाच्या मंच्यावर आयोजित  आजी-माजी कर्मचारी स्नेह मेळाव्यात दुसरे सञ होते मुक्तचिंतन. या स्नेह मेळाव्यास उपस्थित ७१ माजी कर्मचाय्रांचे प्रतिनिधी म्हणून प्राचार्य द.रा.कुलकर्णी,प्राचार्य तथा संस्थेचे सहसचिव  डॉ.व्हि.के.कोठेकर,प्राचार्य डॉ. बालाजी भोसकर,प्रा.विश्वास वसेकर,प्रा.रामदास जायभाय,गौतम सूर्यवंशी,प्राचार्य संग्राम गवळे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांनाच जुन्या आठवणी जागवल्या.  महाविद्यालयाची भौतीक प्रगती पाहून सर्व भारावून गेले. ग्रंथालय,सभागृह,प्रयोग शाळा,कार्यालय,क्रिडा विभाग,प्रेरणा अंकास मिळालेले पुरस्कार,महाविद्यालयाचा निसर्गरम्य परिसर हि सर्व आपल्या महाविद्यालयाची होत असलेली प्रगती सर्व माजी कर्मचाय्रांची मान अभिमानाने उंचावणारी असल्याची भावना प्रत्येकाच्या मुखी होती.
       स्नेह मेळाव्याचा समारोप नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डी.के.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी सेवानिवृत्त  पोलीस महासंचालक सुधाकर सुरडकर प्राचार्य डॉ.जे.एम.मंञी प्रमुख पाहुणे होते.
       प्राचार्य डॉ.जे.एम.मंञी म्हणाले की, प्राध्यापकांनी विद्यार्थीभिमुख व्हावे. चुकीच्या गोष्टीत नगुंतता  महाविद्यालय आणि विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविण्यात स्वतःला गुंतवून घ्यावे.आपल्या आरोग्यासाठी योग्य ती दिनचर्या असावी. आपण गुणवत्तापुर्ण शिक्षणाची कास धरली तरच विद्यार्थी  जीवन विकास चांगल्या रितीने नक्कीच होईल. त्यातून राष्ट्र घडेल.असेही प्राचार्य डॉ.मंञी म्हणाले. अध्यक्ष समारोप संस्थेचे सचिव डी.के.देशपांडे यांनी केला. याप्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी हे होते.सुञसंचालन प्रा.संतोष दंडवते,प्रा.सुभाष बिराजदार यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुवर्ण महोत्सव समितीचे संयोजक उपप्राचार्य यादवराव गायकवाड यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें