रेशीम कोष उत्पादनातून आर्थिक उन्नती
- गिरीश खवसे
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.१०: परंपरागत शेती व्यवसाय चक्रामधून बाहेर पडून आता शेतकऱ्यांनी रेशीम शेतीच्या मागे लागावे ,दुष्काळी मराठवाडा भाग म्हणून संबोधल्या जाते मात्र या भागात रेशीम कोष साठी नैसर्गिक वातावरण असल्याने रेशीम कोषउत्पादनातुन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल त्यासाठी शेतकऱ्यांनी तुती लागवडी साठी तांत्रिक बाबीचे प्रशिक्षण घेऊन व्यवसाय करावा असे आवाहन भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे चे संचालक गिरीश खवसे यांनी कोल्हावाडी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले.
कोल्हावाडी तालुका मानवत येथील ३२ शेतकऱ्यांच्या समूह गटाने मनरेगा योजने अंतर्गत रेशीम कोष उत्पादन ,तुती लागवड करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे, तरुण शेतकऱ्यांचा समूह गट यांना तुती लागवड आणि रेशीम कोष संदर्भात १० दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे ,
त्या साठी भारतीय स्टेट बँक आर.से.टी. च्या वतीने१० जानेवारी रोजी सकाळी१०.वाजता कोल्हावाडी येथील रेशीम कोष सेंटर वर उधोजग परिचय आणि आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक गिरीश खवसे,महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे परभणी येथील क्षेत्रीय व्यवस्थपक डी.डी.भिसे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी विठ्ठल भिसे, जेष्ठ नागरिक काशीनाथ राव भिसे,माजी उपसरपंच रतन भिसे, ग्रा. प. सदस्य दाताराव भिसे, ग्रा.प. सदस्य विक्रम भिसे, भगवानराव भिसे, धनंजय भिसे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गिरीश खवसे यांनी स्वयंरोजगार संदर्भात मार्गदर्शन केले, तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापंक डी. डी.भिसे यांनी, शेतकऱ्यांसाठी च्या विविध योजना संदर्भात माहिती दिली.प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विठ्ठल भिसे यांनी केले. यावेळी कार्यक्रमास तुती लागवड करणाऱ्या महिला ,शेतकरी उपस्थित होत्या, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , राजेश भिसे, गोटू भिसे,कृष्णा भिसे, प्रशांत भिसे, उद्धव भिसे , बंडू भिसे, तुकाराम भिसे, शिवाजी भिसे आदिनी प्रयत्न केले. यावेळी तुती लागवड जाणाऱ्या समूह गटातील शेतकरी महिला शेतकरी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें