- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 जनवरी 2018

*मा.खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्य क्रिकेट स्पर्धेस प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद* 
------------------------------------------------------------------------------------------
*क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सान्यात पालमचा यशराज संघ विजेता*
------------------------------------------------------------------------------------------

सोनपेठ(राजेश खेडकर)
सोनपेठ येथील शारदा नगर मैदानावर संपन्न झालेल्या मा.खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त स्वराज मित्रमंडळ व राष्ट्रवादी युवक काँग्रेस संयुक्त विद्यमाने अयोजीत क्रिकेट स्पर्धेचा अंतीम सामना रविवार दि.७ जानेवारी रोजी खेळल्या गेला. यावेळी अंतिम सामन्यात पालमचा यशराज संघा विजेता ठरला तर चिंचाळा येथील आदर्श संघाने व्दितीय व गंगाखेडच्या संघर्ष संघाने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज मोहन परभणे, उत्कृष्ट गोलंदाज समीर पोलार्ड व सामनाविर अमन शेख हे प्रत्येकी ३००१ रुपयांच्या पारितोषीकाचे मानकरी ठरले.
        येथील शेळगांव रोडवरील शारदा नगर मैदानावर खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा नीमीत्त नगरसेवक श्रीकांत विटेकर यांच्या स्वराज मित्रमंळ व राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या टेनिस बॅाल क्रिकेट स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १५३ क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला होता. दि. १२ जानेवारी २०१८ पासुन सुरु झालेले क्रिकेट सामने पहान्यासाठी प्रेशकांची दररोज मोठी गर्दी दिसुन येत होती.
    अंतिम सामना यशराज क्रिकेट संघ पालम व आदर्श क्रिकेट संघ चिंचाळा जि.बीड यांच्यामध्ये खेळल्या गेला. यावेळी नाणे फेक जिंकुन  आदर्श क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी स्विकारत  १० षटकात ११२ धावांचे लक्ष प्रतिस्पर्धी संघास दिले. यशराज संघाने सावधपने फलंदाजीस सुरुवात केली. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात कोण जिंकनार याची ऊत्सुकता सर्वांना लागुन राहिली होती. अंतीम षटकाच्या शेवटच्या तिन चेंडूमध्ये विजया साठी दोन धावांची गरज असतांना फलंदाज अमन शेख याने एका चेंडूत दोन धावा काढून दोन चेंडु शिल्लक राखत ११३ धावांचे विजयी लक्ष साधले.
     शेवटी विजेत्या संघांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर माजी आमदार व्यंकटराव कदम, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, माजी उपनगराध्यक्ष सुहास काळे्, स्वराज मित्रमंडळाचे अध्यक्ष श्रीकांत विटेकर, राकाँ तालुका अध्यक्ष दशरथ सूर्यवंशी पाटील, मदनराव विटेकर, अमर वडकर, शेख नयुमभाई, उत्तमराव शिंदे, केशवराव भोसले, गोपाळ भोसले, सुनील बर्वे, विठ्ठल पुरबुज, संजय राख, राजेभाऊ कराड, दत्ताराव शिंगाडे, डॅा.श्रीनिवास गुळभिले, अमृत स्वामी, जगदीश बुरांडे,मराठी पत्रकार परिषद सोनपेठ तालुका संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गर्जे, मंजूर मुल्ला, राधेश्याम वर्मा, जावेद शेख, किरन स्वामी, सुभाष सुरवसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत होते. यावेळी प्रमुख पाहुन्यांचे हस्ते यशराज संघास प्रथम पारीतोषीक रोख ५१ हजार रुपये, चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवीन्यात आले व  आदर्श संघ चिंचाळा या संघास द्वितीय पारितोषीक रोख  ३१ हजार रुपये, चषक व प्रशस्तीपत्र तर गंगाखेड येथील संघर्ष संघास २१ हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषीक, चषक व प्रशस्तीपत्र  देऊन गौरविण्यात आले. हे सामने पहान्यासाठी दररोज क्रिकेट
प्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें