*“साने गुरुजी स्मृती स्मारक” उद्घाटन व बक्षीस वितरण समारोह के.प्रा.शाळा चिकलठाणा बु. येथे संपन्न*
चिकलठाणा (बु.) (दिनांक ०८.०१.२०१८ ) आज रोजी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा चिकलठाणा बु. यांच्या वतीने कें.प्रा.शाळा, चिकलठाणा बु. येथे साने गुरुजी यांच्या स्मृती स्मारकाचा लोकार्पण सोहळा व परमपूज्य साने गुरुजींच्या मातोश्री “यशोदाबाई सदाशिव साने” यांच्या दिनांक २ नोव्हेंबर २०१७ रोजी संपन्न झालेल्या स्मृती शताब्दी
वर्षानिमित्त साने गुरुजी कथामाला शाखा चिकलठाणा (बु.) यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी “आई” या विषयावर खुली मराठी निबंध स्पर्धा व नवोद्य सराव परीक्षा, शिक्षकांसाठी “राष्ट्र विकासात माझे योगदान” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांचे पारितोषिक वितरण समारोह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात सर्व गावातून लेझीम पथकासह ग्रंथ दिंडीने झाली. या ग्रंथ दिंडीत गावातील भजनी मंडळातील सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतला.शाळेतील मुलांनी अतिशय शिस्तबद्ध लेझीम खेळून गावातील लोकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला माजीशिक्षक आमदार श्री.दिगंबर देशमुख (कार्यवाहक,नवविकास मंडळ,माजलगाव) हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. तर उद्घाटक म्हणून श्री.अशोक(नाना) काकडे (अर्थ तथा बांधकाम सभापती जि.प.परभणी) ,श्री.राजेंद्र (काका) लहाने (जि.प.सदस्य),श्री.रामरावजी उबाळे (जि.प. सदस्य) श्री.के.एस.आतकरे (संचालक,मराठवाडा साहित्य परिषद),श्री.गाजरे सर (कोषाध्यक्ष,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला,मुंबई) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री.चंद्रकांत (पप्पू) गाडेकर (पं.स.सदस्य,सेलू ),श्री.बसवराज कोरे,श्री.सुनिल गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते),श्री.एस.पी.कुलकर्णी (माजी गटशिक्षणाधिकारी),श्री.खिस्ते सर (केंद्रप्रमुख) या सर्वांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य सानेगुरुजी यांच्या “स्मृती स्मारक” च्या उद्घाटन व दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मधुकर काष्टे (मुख्याध्यापक,कें.प्रा.शा.चिकलठाणा बु.) यांनी केले. सर्व मान्यवरांचे स्वागत गावातील सरपंच श्रीम.घोळवे,उपसरपंच श्री.दत्तराव जाधव व सर्व ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष श्री.उस्मान पठाण ,उपाध्यक्ष श्री.प्रल्हाद पुरी व सर्व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.या नंतर निबंध स्पर्धा, नवोदय सराव परीक्षा व वक्तृत्व स्पर्धा या मधील सर्व विजेत्यांचे प्रमाणपत्र,पारितोषिक रक्कम व श्यामची आई हा ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
आपले मनोगत व्यक्त करताना श्री. अशोक (नाना) काकडे शाळेतील सर्व व्यवस्था या खाजगी संस्थेला लाजवतील अशा आहेत असे गौरोद्गार काढले. श्री.रामरावजी उबाळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले कि शाळेच्या मी सदैव पाठीशी असून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी मदत करील.श्री.राजेंद्र (काका)लहाने हेही शाळेतील संस्कार शिबिराने प्रभावित झाले होते व या प्रकारची शिबिरे सर्व शाळेत झाली पाहिजेत असे सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. दिगंबर देशमुख यांनी मुलांच्या तहान भूक विसरून सलग बसण्याचे कौतुक करून शाळेचे भविष्य उज्वल असल्याचे भाकीत केले.
या सर्व कार्यक्रमासोबत शाळेतील मुलांनी श्यामची आई या पुस्तकातील प्रसंग पत्रावळ,स्वावलंबनाची शिकवण यावर आधारित छोटे छोटे 3 प्रसंग सादर केले. या सर्व प्रसंगांचे गावकरी व पालकांनी खूप कौतुक केले.या ठिकाणी साने गुरुजी यांची श्री.ताल्डे सर यांनी काढलेली रांगोळी व श्री.पवार सर,जालना यांनी साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनी हि लक्षवेधक ठरली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.राजेंद्र होलसुरे,श्रीम.पुष्पलता भोसले,श्रीम.सारिका दवणे,श्रीम.महानंदा सोनटक्के,श्रीम.मेघा देशपांडे व श्रीम.शकुंतला रासवे हे शिक्षकवृंद व शाळेतील परिचर श्री. रंगनाथ आवाड यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे संचलन श्री.प्रवीण कुलकर्णी व श्री.बाबासाहेब काष्टे यांनी केले.
बुधवार, 10 जनवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें