- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 जनवरी 2018

*रोटरी क्लब सोनपेठ चा सामाजिक उपक्रम सिमेंट बेंच भेट*
-------------------------------------------------------

*सोनपेठ शहरातील वर्दळीच्या ठिकाणी बसविले आठ सिमेंटचे बेंच*
-------------------------------------------------------

सोनपेठ (राजेश खेडकर) रोटरी क्लब सोनपेठ च्यावतीने सार्वजनिक स्थळावर जनते साठी  सिमेंट बेंच बसविण्यात आले. आज त्याचा लोकार्पण सोहळा रोटरी क्लबच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. शहरातील पोलीस स्टेशन येथे २, बस स्टँड आवारात २, मोंढा मारुतीमंदिर येथे १, तहसील कार्यालय येथे १, दुय्यम निबंधक कार्यालय येथे १ व वनमारोती दुधगांव येथे १ असे एकंदर आठ बेंचेस बसविण्यात आले आहेत. यावेळी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, सापोनी सदानंद येरेकर, बस स्थानकात आगार प्रमुख तुपसमिंद्रे आणि प्रवासी यांची, मोंढा मारोती येथे संस्थान पदाधिकारी यांची, तहसील कार्यालय येथे मा.तहसीलदार व कर्मचारी यांची तसेच दुय्यम निबंधक कार्यालय येथे अधिकारी व कर्मचारी बांधवांची उपस्थिती होती.
यावेळी रोटरी क्लब सोनपेठचे अध्यक्ष बालमुकुंद सारडा, सदस्य सर्वश्री किरन चौलवार, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, इंजीनिअर चंद्रकांत लोमटे, संजय काबरा, प्रा.विठ्ठल जायभाये, संजय राख, प्रदीप गायकवाड व संजय इंदुरकर आदींसह सर्व रोटरी क्लब सदस्यांचीही उपस्थिती होती. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें