मुलगा मुलगी असा भेदभाव नकरता पालकंनी शिक्षण द्यावे==सुनिता काळे
प्रतिनिधी.वालूर.
सेलु तालुक्यातील जि.प.शाळा केमापूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात बालिका दिना निमित्ताने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थीनी कु.जयश्री गुठ्ठे हीने सावित्रीबाईं चा तर चि.अभिषेक आंधळे व हरिष आंधळे याने ज्योतीबांचा वेश धारण केला होता.गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली त्यावेळी हे विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिंधूताई केंद्रे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनिता काळे, सुमिता सबनिस तर सरपंच उषाताई गुठ्ठे,उपसरपंच गुजाबाई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना सुनिता काळे यांनी मुलगा मुलगी असा पालकांनी भेदभाव नकरता समानतेने शिक्षण द्यावे असे सांगितले
बालिका दिनाच्या निमित्ताने आयोजित बाल आनंद मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ तयार करून आणले होते. त्यामध्ये पाणी पुरी ,भेळ,पोहे, बालुशाही ,पेडा तर कोणी भाजीपाला, फळं विक्रीसाठी ठेवले होते. यामधून खरेदी व विक्रीचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला.
याच कार्यक्रमात दुपारी विद्यार्थ्यांचे कवी संमेलन घेण्यात आले कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुमिता सबनिस ह्या होत्या यावेळी शाळेतील जयश्री गुठ्ठे, स्नेहा आंधळे, कविता राठोड, पुजा सारोक ,पुनम राठोड, अश्विनी गुठ्ठे, वैष्णवी गुठ्ठे, निखिल अंभोरे या विद्यार्थ्यांनी कवी संमेलनात भाग घेतला.
यावेळी शाळेतील 6वीचा विद्यार्थी प्रदिप सारोक याने काढलेल्या 25 चिञांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शनही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.एलिमेंट्री परीक्षा पास झाल्या बद्दल त्याचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सहारा एमकेसीएल सेंटर वालूर च्या वतीने घेण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या चरिञावरील ऑनलाईन परीक्षेत पास झालेल्या 42 विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.जि.प.शाळा वाईचे विद्यार्थी यांनीही सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद ठाकर, सुञसंचलन प्रणिता गाडे ,आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर ईघारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिगंबर रोकडे , दगडोबा माघाडे, अरूण काजळे, सविता आंधळे, विष्णू गुठ्ठे, ज्ञानदेव केंद्रे ,शारदा आंधळे यांनी पुढाकार घेतला.
=सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सुनिता काळे, सिंधू केंद्रे(अध्यक्ष शा.व्य.समिती),उषाताई गुठ्ठे( सरपंच) सुमिता सबनिस ,प्रणिता गाडे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें