आमठाणा येथील आठवडी बाजारात शुकशुकाट
अजय बोराडे.
आमठाना-प्रतिनिधी-सिल्लोड तालुक्यतील आमठाना येथील आठवडी बाजार हा बुधवारी असतो मात्र भीमा कोरेगाव घटनेमुळे महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती त्याचे पडसाद ग्रामीण भागात सुध्दा पहावयास मिळले आमठाना या गावाला लागून जवळपास 50 ते 60 खेडे आहेत याठिकान चे लोक आठवडी बाजार करण्यासठी येथे येतात ही खूप मोठी बाजार पेठ आहे मात्र महाराष्ट्र बंद मुळे व्यापर्यनी बाजारात दुकाना लावल्या नाही जवळपास चे लोक आडवडी बाजार असल्यामुळे बाजार करण्यासाठी आले मात्र याठिकाणी फक्त शेतकरी वर्गानेच आपल्या स्वतःच्या शेतातील भाजीपाला विक्रीला आणला होता त्यांनीच भाजीपाला विकला मात्र नागरिकांना कमी प्रमाणात भाजीपाला आल्यामुळे नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागले मात्र या घटनेमुळे सामान्य नागरिकांची हाल पहावयास मिळाली यामुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली सकाळ पासूनच याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही या परिसरातील शाळा सुद्धा सुरळीत चालू होत्या
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें