- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 20 जनवरी 2018

*अपूर्वा तंत्रनिकेतन आयोजित तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद.*

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
श्रीराम प्रतिष्ठान संचलित अपूर्वा तंत्रनिकेतन सेलू यांच्या मार्फत इयत्ता .१० वी व इयत्ता  १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यालय मंठा या ठिकाणी करण्यात आले होते. ई.१० वी व ई १२ वी विद्यालयीन टप्पा ओलांडल्यानंतर विद्यार्थी अश्या वळणावर उभा असतो जिथे शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध असतात परंतु त्यापैकी योग्य तो अभ्यासक्रम निवडणे विद्यार्थी व पालकांसाठी नेहमीच अवघड काम असते.योग्य तो अभ्यासक्रम निवडणे सोपे ह्वावे या दृष्टीकोनातून तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे,उदघाटक तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून अभियांत्रिकी सल्लागार समितीचे अध्यक्ष मा.श्री महेश पाटील, अपूर्वा तंत्रानिकेतनचे प्राचार्य प्रा.अशोक बोडखे,स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोरे सर,खरात सर,कुलकर्णी मॅडम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्याक्रमचे प्रास्ताविक अपूर्वा तंत्रानिकेतनचे प्राचार्य प्रा.अशोक बोडखे यांनी करत तंत्रशिक्षण अभ्यासक्रमातील उपलब्ध असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाविषयी सखोल माहित देत त्यामध्ये असलेल्या विविध रोजगाराच्या संधी तसेच तंत्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण कण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनेविषयी माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक श्री महेश पाटील यांनी आपल्या मार्गदशनपर भाषणात विद्यार्थ्यांनी आपले करिअर ऐनवेळी न ठरवता ते पूर्वीपासूनच ठरवून त्या धैय्या पर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांनी योग्य वेळी घेतलेला अचूक निर्णय,कष्ट करण्याचे धाडस व स्वतःवरील विश्वास जर अंगी बाळगला तर तो विद्यार्थी हमखास यशस्वी होतो.स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री मोरे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षनावेतिरिक्त व्यावसायिक अभ्यासक्रम किती महत्वाचा आहे या विषयी मार्गदर्शन केले.तसेच स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री ए डी खरात सर यांनी योग्य तो अभ्यासक्रम निवडून त्या बरोबर वेळेचे योग्य ते नियोजन केले तर विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात नाविन्य प्राप्त करू शकतो.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन अपूर्वा तंत्रनिकेतनचे प्रा.विष्णू ताठे सर तर आभार प्रदर्शन स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री ए डी खरात सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री.जाधव सर,श्री.फंड सर,भगवान कुलकर्णी,सुशील आवटे व पांडुरंग चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें