- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 20 जनवरी 2018

*परभणी येथे प्रथमच मराठवाडा साँफ्टबाँल लीग स्पर्धा* 

   
परभणी ( समशेर खान )महाराष्ट्र राज्य साँफ्टबाँल  संघटनेच्या मान्यतेने व परभणी जिल्हा साँफ्टबाँल संघटनेच्या वतीने परभणी येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परभणी दि.२० व २१जाने २०१८रोजी मराठवाडा लिग स्पर्धैचे आयोजन करण्यात आले आहे,
या स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून आ.डॉ. राहुल पाटील, अर्थ व बाधंकाम जि.प. सभापती अशोक काकडे, जिल्हाक्रीडाधिकारी सी.व्ही. साखरे, उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे, प्रा.रंमाकांत बनसोडे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात साँफ्टबाँल खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा खेळाडूंना आशियाई खेळाडूंचा खेळ पाहता यावा ,आशियाई स्पर्धेत खेळण्याचीसंधी मिळावी या साठी  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,  मराठवाड्यातील ८जिल्ह्याचे ११संघ सहभागी होणार आहेत .दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा साखळीपध्दतीने खेळवण्यात येणार आहेत . स्पर्धैकाची निवास व भोजन व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी सर्व संघांना गणवेष वाटप करण्यात येणार आहे.अशी आयोजन समितीचे सचिव प्रसेन्नजित बनसोडे यांनी कळवले आहे. संघ मालक म्हणून  ११ प्रायोजकांनी प्रायोजकत्व घेतले  आहे. स्पर्धेतील विजेत्या संघांना प्रथम ११०००/-द्वितीय ७०००/-तृतीय ५०००/- रोख रूपये पारीतोषिक व  चषक तसेच उत्कृष्ठ खेळाडू स्मॅशर , कॅचर,पिचर यांना रोख रूपये २०००/- प्रत्येकी व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे .
स्पर्धेतून मराठवाड्याचा संघ निवडण्यात   येणार असून निवडलेला संघ पूणे येथे होणाऱ्या  आशियाई साँफ्टबाँल लिग स्पर्धेत मराठवाड्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे असे अहवान स्पर्धा  रणजित काकडे, कैलास माने, गणेश माळवे, प्रंशात नाईक, यांनी केले.
स्पर्धा यशस्वी ते साठी परीश्रम ओंकार खोत,अंगद सुतारे,  श्रीकांत पांडे, गणेश दिक्षीत, अविनाश आघाव, डॉ. सचिन चव्हाण, संदिप तिवारी.बाबुराव गायकवाड, रवि गांवडे, सुबोध वीर.घेत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें