माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांना वाढदिवसा निमित्य चाहत्यांची त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला .
अजय बोराडे
प्रतिनिधी.सिल्लोड.
वाढदिवसा निमित्य शहरात ठिकठिकानी त्यांची पेठे व लाडु तुला करुन त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
सकाळीच आमदार सत्तार यांच्या निवासस्थानी चाहत्यांची माेठी गर्दी उसळली हाेती. त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या नंतर शिक्षक काँलनीत रुपेश कुलकर्णी मित्र मंडळातर्फे आमदार सत्तार यांची लाडु तुला करण्यात आली .त्यानंतर पाबळवाडी येथे त्यांची जिलेबीतुला करून नागरी सत्कार करण्यात आला .दुपारी ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे उद्हाटन आमदार सत्तार यांच्या हस्ते पार पडले.तसेच माजी मंत्री राजेंद्र दर्डा,जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा देवयानी डाेणगावकर,जेष्ट नेते प्रभाकरराव पालाेदकर,शहर अध्यक्ष नामदेव पवार,माजी आमदार कल्याणराव काळे,माजी आमदार नितीन पाटील,काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे,जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे,श्रीराम महाजन,संजय जाधव,संदिप दारुंटे,राजाभाउ देशमुख,संताेष काेल्हे,बाजार समीतीचे संदिप बाेरसे,सभापती धनराज बेडवाल,मिनाताई शेळके,विनाेद तांबे ,ऩगराध्यक्ष अँड कमर,सभापती धरमसिंग चव्हाण,माजी जि.प.सदस्य लखुसिंग नाईक,प्रभाकार काळे,माजी सभापती बाबु चव्हाण,जिल्हा परीषद गाेपीचंद जाधव
नवीन गांधी भवनात सिल्लाेड व साेयगाव तालुक्यासह औरंगाबाद व जालना जिल्हातील आमदार सत्तार यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माेठी गर्दी केली हाेती.
दिवसभर सुरू होतो शुभेच्यांचा वर्षाव
माजी मंत्री आ अब्दुल सत्तार यांना शुभेच्या देण्यासाठी शहरातील नवीन गांधी भवन येथे मतदार संघ व औरंगाबाद - जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी पुष्प गुच्छ देवून आ अब्दुल सत्तार यांना शुभेच्या दिल्या.
सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष अब्दुल समीर अ सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर,उपसभापती नंदकिशोर सहारे, यांच्यासह माजी जिल्हा परिषद सभापती विनोद तांबे, नरसिंग चव्हाण, दामोदर गव्हाणे, आदींची उपस्थिती होती.
आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.2 मंगळवार रोजी सामाजिक उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानात गरिबांना धान्य वाटप, तसेच सायंकाळी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका काँग्रेस तसेच आ अब्दुल सत्तार मित्र मंडळा च्या वतीने करण्यात आले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें