मानवत येथे दर्पण दिन उत्साहात साजरा.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०६: ०६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे नियतकालिक सुरु केले. मराठी भाषेचे पहिले वृत्तपत्राचे स्मरण म्हणुन महाराष्ट्रात दर्पण दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने शिवसेना मानवत तालुक्याच्या वतीने मानवत येथील पञकारांचा सत्काराचा कार्यक्रम आज दि.६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पंचायतसमीती येथे घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्यां प्रतिमेचे पुजन करुन त्याना अभिवादन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.या वेळी उपस्थीत मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थीत सर्व पञकारांचा यावेळी मानचिन्ह ,पेन,डायरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार आश्विनी जाधव ह्या होत्या तर व्यासपिठावर यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तथा जि.प.सदस्य विष्णु मांडे,पोलीस निरिक्षक प्रदिप पालीवाल,नायबतहसिलदार नकुल वाघुंडे ,गटविकास अधिकारि छडिदार साहेब,सभापती बंडु मुळे,उपसभापती संतोष जाधव आदी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुञसंचालन मधुकर उबरिकर यांनी केले तर आभार प्रदषण मानवत तालुका पञकार संघाचे अध्यक्ष सत्यशिल धबडगे यांनी मानले.
शनिवार, 6 जनवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें