- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 जनवरी 2018

सोनपेठ येथे दर्पण दिन साजरा
----------------------------------
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन
-------------------------------------------------------
सोनपेठ- येथील कै.राजीव गांधी महाविद्यालयात दर्पण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
आजच्याच दिवशी १८३२ साली आचार्य जांभेकर यांनी दर्पण हे नियतकालिक सुरु केले होते मराठी भाषेचे पहिले वृत्तपत्राचे स्मरण म्हणुन महाराष्ट्रात दर्पण दिवस साजरा करण्यात येतो. येथील कै.राजीव गांधी महाविद्यालयातही आज यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्यावतीने  सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष शिवाजी मव्हाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी पवार, भिमराव वारकरे, शेख बिलकीस, ज्योती चव्हाण, मीनाताई सावंत तसेच पत्रकार राधेश्याम वर्मा, सिध्देश्वर गिरी, सुग्रीव दाढेल, मंजूर मुल्ला, मलिकार्जून सौंदळे, किरण स्वामी यांसह आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें