- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 8 जनवरी 2018

*संस्कारांचे बीजारोपण करण्यासाठी साने गुरुजी कथामालेची नितांत गरज : उपशिक्षणाधिकारी मा.विठ्ठल भुसारे यांचे प्रतिपादन*

*सेलू येथे शिक्षकांसाठी आयोजित विभागीय कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न*

सेलू .

येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील साने गुरुजी कथामाला हेलस ता.मंठा जिल्हा जालना या कै.दत्तात्रय हेलसकर यांनी स्थापन केलेल्या कथामालेच्या मराठवाडा विभागस्तरीय अंतिम फेरी संपन्न झाली

या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुंबई येथील सुप्रसिद्ध गीतकार व पटकथाकार प्रा.चंद्रकांत शिंदे,परभणी येथील उपशिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारे,विशेष उपस्थिती म्हणून श्री.के.बा.शि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष अॅड.लक्ष्मीकांत सुभेदार, सहसचिव डाॅ.भागचंद मालाणी, अॅड श्रीकांत वाईकर ,मुख्याध्यापक दत्तात्रय नागरे,आश्रावंती हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बोलताना उपशिक्षणाधिकारी भुसारे साहेब म्हणाले की,दत्तात्रय हेलसकर यांनी सुरू केलेल्या या कथामालेची हे  रौप्य महोत्सवी वर्ष आहे. सरांनी या कथामालेतून अनेक कार्यकर्ते तयार केले आहेत.संस्कार हाच मुळी यशस्वी जीवनाचा पाया असुन संस्काररूपी भक्कम पायावरच माणूस म्हणून जगण्यासाठी यशस्वीपणे उंच इमारत उभारण्यात सगळ्यात महत्वाचा सहाय्यक घटक म्हणजे शिक्षक होय.

शाळा या संस्कारांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे संस्कार केंद्र व्हायला हव्यात. यासाठी गरज आहे कथेतून प्रबोधनाची त्या कामी कथामालेने शिक्षकांसाठी मराठवाडा विभागातील प्रत्येक जिल्ह्य़ात घेतलेल्या या विभागीय कथाकथन स्पर्धा निश्चितच स्पृहणीय आहेत असे ते म्हणाले.
तसेच या पुढच्या स्पर्धा ह्या राज्यस्तरीय घ्याव्यात व या कामी माझे काही सहकार्य लागल्यास ते मी आवश्य करेन असे ते म्हणाले.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे म्हणाले की, आजकालच्या तंत्रज्ञान समृद्ध युगात आई वडीलच जर मोबाईल वर असतील तर मुलांना कथा कोण सांगणार. शिक्षक म्हणून आपण ही जबाबदारी पार पाडावी असे ते म्हणाले. कथा या मुलांच्या भावविश्वात नवीन ज्ञानाची
सातत्याने भर घालत असतात.म्हणून अशीच कथेची पारायणे होणे नितांत गरजेचे आहे.या कामी कथामाला निश्चितच प्रेरणादायी आहे.

या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी आपापल्या कथांचे उत्कृष्ट असे सादरीकरण करताना टाळ्यांची दाद मिळवली.कधी भावनेला स्पर्शून आनंदी तर कधी दुःखाची झालर व पापण्याच्या कडा ओलावणारा प्रसंग अशा सादरीकरणाने सभागृहातील वातावरण कधी भावनिक तर कधी हशा पिकवणारे झाले.

मराठवाडा विभागातील एकूण 156 स्पर्धक हे जिल्हास्तर प्राथमिक फेरीत सहभागी झाले होते. या पैकी प्रथम क्रमांकप्राप्त 7 स्पर्धक या कथाकथन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सेलू येथे आले होते.

या स्पर्धेत यशस्वी झालेले स्पर्धक पुढीलप्रमाणे,

1. प्रथम क्रमांक - बन अनुपमा- नांदेड.

2. द्वितीय क्रमांक- गुडसूरकर धनंजय - लातूर.

3. तृतीय क्रमांक - पोटे शिवदास - हिंगोली.

4. उत्तेजनार्थ - खटाळ मिनाक्षी- बीड.

परीक्षक म्हणून दुर्गादास कुलकर्णी, सुरेश हिवाळे, शिरीष देशमुख यांनी जबाबदारी पार पाडली.

प्रास्तविक मुख्य संयोजक कल्पना हेलसकर यांनी केले. सुत्रसंचलन योगेश ढवारे यांनी केले.तर आभार प्रमोद देशमुख यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा.सुहास सदाव्रते,आर.आर जोशी,विजय वायाळ,योगेश ढवारे,सतीश कुलकर्णी, मंताजी ढाकरे,माधव वाजे,जगदीश कुडे,सुनील गायकवाड,आदींसह कथामालेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमास सेलू नगरातील सुजाण नागरिक, शिक्षक, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.
शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें