- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 31 जनवरी 2018

शिवजयंती निमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन

बच्चु कडु यांच्या हस्ते उद्घाटन : लाखाहून अधिक शेतकरी होणार सहभागी

सेलू :- दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रमाने येथील शिवजन्मोत्सव सोहळा लोकप्रिय होतो.
यावर्षी देखिल 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या चार दिवसात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बळीराजा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे यांनी दिली.
या प्रदर्शनात दोनशेहून अधिक कंपन्यांचे विविध स्टाॅल असणार आहेत. शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजिना असणाऱ्या या कृषी प्रदर्शनात आधुनिकतेकडे नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा अविष्कार पहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन म्हणजे ज्ञान व माहितीचा खजिनाच असणार आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून आयोजित परिसंवादात नामवंत तज्ञांचे व प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
याशिवाय या प्रदर्शनात शेतीचा बदलता चेहरा, पीक पध्दतीतील नवनवे बदल, खते, आणि पाणी व्यवस्थापनातील बदल, हवामानानुसार निर्माण झालेली आव्हाने, शेती मालाची बाजारपेठ, बायोटेक्नालाॅजी, बी-बियाणे, टिश्यू कल्चर, अत्याधुनिक अवजारे, ट्रॅक्टर, सौर ऊर्जा, इक्विपमेंट, पशुखाद्य, डेअरी व्यवस्थापन, फलोत्पादन, पोल्ट्री सोल्युशन, कृषी विषयक पुस्तके, नियतकालिके या सर्व क्षेत्राचे अंतरंग उलगडून दाखविणारे नामांकित कंपन्यांचे स्टाॅल सहभागी होणार आहेत.तसेच शासकीय यंत्रणा, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांच्या देखिल सक्रिय सहभाग रहाणार आहे.  या प्रदर्शनाचे सहप्रायोजकत्व सेलू नगर परिषदेने स्विकारले असुन शासकीय विश्रामगृहातआयोजित बैठकीत नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सक्रिय सहभागीहोणार असल्याचे सांगितले.
तसेच शेतकऱ्यांचा मुलांना इंग्रजी माध्यमात व उच्च शिक्षण घेता यावे म्हणून श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व घटक संस्था मध्ये प्रदर्शन स्थळी नोंदणी केल्यास पंचवीस टक्के फीस मध्ये सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. संजय रोडगे यांनी केली. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे, मराठा सेवा संघाचे तालूकाध्यक्ष वसंतराव बोराडे, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, बजरंग आरकुले, रणजित चव्हाण, महेश मुसळे, रामेश्वर शेरे,  शशांक टाके, संतोष शिंदे, कृष्णा रोडगे, शिवाजी पांचाळ, विशाल गव्हाडे, आदी परिश्रम घेत आहेत.

मिरवणूकीच्या खर्चाला फाटा दिल्याने कौतुकाची थाप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूकच्या खर्चाला फाटा देत शेतकरी हितार्थ बळीराजा कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याने सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत होत असुन कौतुकाची थाप मिळत आहे. तसेच चार दिवसीय प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें