*स्व.नितीन चषक विजेता राजु कान्हे जालना तर उपविजेता लातूर संघ*
*खेळातून सांघिक भावना निर्माण होते ना.अर्जुन खोतकर*
सेलू ( शमशेर खान) बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित्त स्व. नितीन चषक राज्य क्रिकेट स्पर्धा दि. 31 जाने.रोजी लातूर वि. राजु कान्हे जालना संघादरम्यान जालना संघाने 6 गडी राखून स्व.नितीन चषकाचा दावेदार ठरला.
लातुर वि. राजु कान्हे जालना संघ दरम्यान नाणे फेक करतांना सहाय्य क जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नगराध्यक्ष विनोद बोराडे, मा.आ.हरीभाऊ काका लहाने उपस्थिती,लातूर संघ नाणेफेक जिकुंन प्रथम फंलदाजी करतांना 20 षटकात 8 बाद 185 धावा केल्या यात अकीफ शेख 27, धावा, चेतन सोनवणे 35 , जय दिप भराडे 57 धावा चौफरे फटाके बाजी केले .लातूर संघाच्या वतीने गोलंदाजी अशिष देशमुख 2 तर विनोद खरात ,1-1गडी बाद केले.
जालना संघ 185 धावाचे लक्ष्य 18.2 षटकात 186 काढल्या व 6 गडी राखून विजेता तर लातूर उपविजेता ठरला.
यात ऋषिकेश काळे23 ,तर संतोष खलसे 36 यांनी चौफरे फटके बाजी करत नाबाद धावा राहिला,रमन्ना नंदागिरी 49 धावा, संतोष जाधव 35धावा, करत विजेता ठरला, लातूर च्या शुभम कोठारी ने 2गडी बाद केले.
सामनावीर पुरस्कार जालनाच्या रमन्ना नंदागिरी यास ,मान्यवर च्या हस्ते देण्यात आला.
ना.खोतकर म्हणाले खेळातून चांगले वाईट धडे मैदानातून मिळतात,व सांघिक भावना निर्माण होते.यांचे प्रत्यय काका नी गेल्या 18 वर्षे पासून स्व.नितीन चषक क्रिकेट स्पर्धे यशस्वीपणे घेत आहेत, ही गोष्ट कौतुकास्पद असल्याचे उद्गार काढले.
बक्षीस वितरण सोहळ्यास पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्य मंत्री ना.अर्जुन खोतकर, नगराध्यक्ष विनोद बोराडे, आ.डॉ. राहुल पाटील, जालना जिल्हा प्रमुख ए.जे.बोराडे उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, कु.उ.बा.स. सभापती रवि डासाळकर, बाबासाहेब मोरे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, नूतन संस्था सहसचिव जयप्रकाश बिहाणी, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव,जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. विवेक नांवदार आडळकर, मुख्याध्यापक के.व्ही.वाघमारे, दत्ताराव मोगल, न.प.सदस्य विनोद तरटे, मंडळाचे अध्यक्ष आ.हरिभाऊ लहाने, आदी मान्यवर हस्ते विजेता संघ राजच कान्हे जालना संघास रोख 51 हजार रुचे( सभापती रवी डासाळकर)यांच्या वतीने देण्यात आले. तर लातूर संघ उपविजेता 31 हजार.रू चे ( जि.प.गटनेते-राम नाना खराबे )तर मालिका वीर पुरस्कार रमन्ना नंदागिरी यास रोख 11हजार ( सुभाष काला अंरिहत गँस एजन्सी) ,तर चषक सुधाकर पवार यांच्या वतीने देण्यात तर रोख बक्षिसे समीर खाँन गुत्तेदार, व सय्यद हमीद , संपतराव शेरे,प्रंशात गोळेगांवकर, किरण दिग्रसकर , यांनी दिली.
कार्यक्रम चे प्रास्ताविक मंडळाचे सचिव संदिप लहाने, संयोजक गिरीष लोडया ,यांनी केले,सुत्रसंचालन मोहन बोराडे, तर आभार अविनाश शेरे यांनी मानले.
पंच म्हणून स्पर्धा यशस्वी सय्यद जमशेद, सुदिप शहा तर गुण लेखक अंरविद देशंपांडे, समालोचक डॉ. अनिल शेळके, पवन फुलमाळी , अवधूत लिपने काम पाहत आहेत.
स्पर्धा आयोजन समिती सचिव संदिप लहाने,गणेश माळवे, डी.डी.सोन्नेकर, प्रा.नागेश कान्हेकर,पांडुरंग कावळे,जयसिंग शेळके, रणजित गजमल, अविनाश शेरे,गोविंद शर्मा, स्वप्निल राठोड, प्रा. नागेश कान्हेकर, कुष्णा गायकवाड, वैभव वैद्य,शेखर कथले, राजेश राठोड, दिपक निवळकर,संतोष रोडगे.
[
फोटो। ओळ : स्व.नितीन चषक क्रिकेट स्पर्धेत विजेता राजु कान्हे जालना संघा सोबत ना. अर्जुन खोतकर, आ.डॉ. राहुल पाटील, नगराध्यक्ष विनोद बोराडे,रवि डासाळकर ए.जे.बोराडे, हेमंतराव आडळकर, माजी आ.हरिभाऊ लहाने, संदिप लहाने, जयसिंग शेळके, आदी मान्यवर.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें