- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 12 जनवरी 2018

*राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*

सेलु:- येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती (ता.12)  वार शुक्रवार रोजी साजरी करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा तोष्णीवाल, उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक दगडोबा माने आदी उपस्थित होते. यावेळी या शालेय विद्यार्थी हर्षल फोपसे व इंद्रभुषण बोराडे यांनी "प्रतापगडावरील पराक्रमाचा" पोवाडा सादर केला. तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती  गोंविद आवटे, श्याम शेळके आदी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना मनोगतातुन दिली. यानिमीत्याने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दामोधर ठोके यांनी तर आभार कैलास ताठेे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश येवले, इंद्रजित मोरे, योगिता लोखंडे, सविता शर्मा यांनी काम केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें