*सप्ताहामध्ये होणाऱ्या खर्चापैकी २५टक्के निधी शाळा व वाचनालयासाठी खर्च करा*
*-आमदार श्री.विजय भांबळे*
प्रतिनिधी.
सेलू(समशेर खान)
नवीन वर्षाच्या निमित्त ग्राम रायपूर ता.सेलू येथे श्री.स्वामी समर्थ वाचनालयाच्या उद्घाटनासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचेअध्यक्ष म्हणून जि.प.सदस्य श्री.रामराव उबाळे,प्रमुख अतिथी म्हणून जि. प.सदस्य श्री.राजेंद्रकाका लहाने,बालासाहेब रोडगे, पप्पू गाडेकर,रामेश्वर गाडेकर,सरपंच गुलाब गाडेकर आदी उपस्थित होते तथा *उद्घाटक म्हणून आमदार श्री.विजय भांबळे हे आवर्जुन उपस्थित होते.* त्यांनी वाचनालयाचे रीतसर उद्घाटन केल्यानंतर झालेल्या सभेत, वाचनालयाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांचे कौतुक केले आणि मानवाच्या विकासासाठी वाचनाचे महत्व पटवून दिले. यावेळी त्यांनी गावात सप्ताहासाठी जमा होणाऱ्या रक्कमेपैकी २५ टक्के रक्कम ही शाळा आणि वाचनालायासाठी खर्च करावी असे सुचवले.
या वेळी जि.प.प्राथ.शाळा,रायपूरचे मुख्याध्यापक श्री.कैलास सोळंके यांनी शाळेसाठी स्वखर्चाने बोअरवेल करून दिली म्हणून गावकऱ्यांनी श्री.कैलास सोळंके यांचा आमदार श्री.विजय भांबळे यांच्या हस्ते सत्कार केला व त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
शाळेतील कु.पूजा गाडेकर व अर्पिता गाडेकर या विद्यार्थीनीनी आमदार साहेबांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन शाळेसाठी संगणकाची व पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्यासाठी डांबरी रस्ता व बसची मागणी केली.आमदार साहेबांनी मुलींची मागणी लवकरच पूर्ण करेल असे आश्वासन दिले.
सूत्र संचलन श्री.लक्ष्मण गाडेकर यांनी केले.
मंगलवार, 2 जनवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें