*पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत गुजरात ,पुणे विद्यापीठ विजयी सलामी
समशेर खान
सेलू : येथील नूतन महाविद्यालय,सेलू व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेच औपचारिक उद्घाटन दि. २ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वा कै.श्रीराम भांगडीया क्रीडा नगरी ,नूतन महाविद्यालय मैदान सेलू येथे गोवा विद्यापीठ वि. रक्षा शक्ती विद्यापीठ अहमदाबाद दरम्यान गोवा संघाने १२ गुणांनी विजयी झाला, गुजरात विद्यापीठ अहमदाबाद वि. विर नर्मदा विद्यापीठ सुरत दरम्यान ६ गुणांनी गुजरात विद्यापीठ अहमदाबाद विजयी, राणी दुर्गा वती विद्यापीठ जबलपूर वि. भक्त कवी विद्यापीठ जुनागड दरम्यान ०२ गुणांनी जबलपूर विजयी, गुजरात विद्यापीठ अहमदाबाद वि. जिवाजी विद्यापीठ ग्वाल्हेर दरम्यान जिवाजी ग्वाल्हेर अतितटी सामन्यात २ गुणाने विजयी, भारतीय विद्यापीठ पुणे वि. भरकातुल्ला वि.भोपळ दरम्यान पुणे विद्यापीठाने १५ गुणांनी सामना जिंकला, क्रीडा क्षेत्रात ज्यांचे उल्लेखनिय योगदान आहे असे स्व. प्रा. शंकर गंधम, सुभाष झुटे, राधेशाम दायमा यांच्या स्मरणात प्रेक्षक गँलरींना दिलेली नाव सर्व प्रेक्षकांच्या आकर्षणाचा विषय ठरली. प्रसंगी नगराध्यक्ष मा. विनोदराव बोराडे,उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, क्रीडा
संचालक तथा आयोजन समिती सचिव डॉ. मनोज रेड्डी , उपाध्यक्ष खो-खो संघटना प्रदिप देशमुख, संस्था सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रा . यु.डी. इंगळे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी,प्रा. यादव गायकवाड,प्रा.डॉ. माधव शेजुळ, प्रा.के.के. कदम, प्रा.नागेश कान्हेकर, डी.डी. सोन्नेकर , आदी मान्यवर उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें