- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 1 जनवरी 2018

*आज पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ  खो-खो स्पर्धेचे उद्घाटन,*

*_स्पर्धेची जय्यत तयारी, 45 संघ दाखल._*
सेलू ( समशेर खान) नूतन महाविद्यालय,सेलू व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेच उद्घाटन दि. 2 जानेवारी रोजी दु -04:30 वा कै.श्रीराम भांगडीया क्रीडा नगरी  ,नूतन महाविद्यालय मैदान, सेलू येथे होणार आहे.या स्पर्धेचे उद्घाटन मा.डॉ. पंडित विद्यासागर ( कुलगुरू, स्वा.रा.ती.म.वि.नांदेड) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.विजयरावजी भांबळे असतील.प्रमुख अतिथी म्हणून मा.आ.बाबाजानी दुर्राणी , मा.आ.मोहनराव फड, मा.आ.राहुल पाटील,मा. आ. विक्रम काळे, मा.पी. शिवशंकर, (जिल्हाधिकारी,परभणी) मा. विनोदराव बोराडे,मा. विरेंद्र भांडारकर (सहसंचालक साई औरंगाबाद) अँड.बाळासाहेब जामकर, डॉ. चंद्रजित जाधव, डॉ. प्रदीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यापुर्वी  दुपारी 2:30 वा सर्व सहभागी संघांची भव्य रॅली नूतन विद्यालय ते नूतन महाविद्यालय क्रीडांगणा पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धा मँटवर व प्रकाश झोतात खेळवल्या जाणार आहेत. स्पर्धा सकाळी 7 ते 10 वा. दुपारी 4 ते 8 वा. या दरम्यान होणार आहेत.
सेलू शहरात प्रथमच होणार्‍या या भव्य क्रीडा स्पर्धेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन डॉ. एस.एम.लोया, डी.के.देशंपांडे, व्ही. के.कोठेकर, जयप्रकाश जी बिहाणी, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रा.यादव गायकवाड, प्रा.के.के.कदम, प्रा.नागेश कान्हेकर, प्रा.एल.एच. काळे, प्रा. डी.एच.जामगे, नूतन संस्था परिवारातर्फे करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें