- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 1 जनवरी 2018

अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन

सिल्लोड:(अजय बोराडे) माननीय आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जि.प. प्रशाला मैदान सिल्लोड येथे सर्वरोग निदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी-कृत्रिम भिंगरोपण शस्रक्रिया व रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. मोतीबिंदूमूळे अंधःत्व आलेल्या नेत्र रुग्णांनी व इतर सर्व रुग्णांनी या शिबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आहे आहे. तसेच 2 जानेवारी रोजी समाजप्रबोधनकार निवृत्ती इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आले आहे.

तसेच तीन, चार, पाच आणि सहा जानेवारी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजीत करण्यात आले आहे. तीन तारखेला शहरातील विविध विकासकामांचे शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. चार तारखेला शहरातील दिव्यांगाणा निधी वाटप, तर पाच तारखेला कव्वालीचे कार्यक्रम होणार आहे. सहा तारखेला भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें