- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 1 जनवरी 2018

इंदोर येथील राष्ट्रीय शालेय साँफ्टबॉल स्पर्धेत  निलेश माळवे यास कास्यपदक प्राप्त झाल्या बदल सेलूत जल्लोषात स्वागत.
सेलू (समशेर खान)
63 वी राष्ट्रीय शालेय साँफ्टबाँल स्पर्धेत  19 वर्ष मुले गटात  नूतन महाविद्यालय सेलू च्या चि. निलेश गणेश माळवे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून  महाराष्ट्र राज्य साँफ्टबाँल संघास कास्यपदक प्राप्त करून दिले .
राष्ट्रीय शालेय साँफ्टबाँल स्पर्धा इंदोर( मध्येप्रदेश) येथे  दि.24 ते 30 डिसें 2017 दरम्यान  महाराष्ट्र संघाने तेलंगणा, सी.बी.एस.सी, विद्या भारतीय , संघाचा पराभव करत उपांत्य फेरी त दिल्ली संघा सोबत कडवी झुंज देत कास्यपदक प्राप्त केले.
सेलूत शहरात आगमन होताच नूतन महाविद्यालयात  निलेश चा फेटा व पेढे वाढुन सत्कार संस्थाध्याक्ष डॉ. एस.एम.लोया, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, उपप्राचार्य यादव गायकवाड, प्रा.नागेश कान्हेकर, प्रा.के.के.कदम, डी.डी.सोन्नेकर , सतिश नावाडे,गणेश माळवे,प्रशांत नाईक, रेणुका सोन्नेकर यांनी केला.
विद्यानगर येथे खेळाडू मित्र मंडळ, कौटुंबिक यांनीही फटाके फोडून, स्वागत आजी लक्ष्मी बाई, आई सौ.छाया माळवे, सौ.गजमल, सौ.मुंडे, सौ.बोराडे, सौ.कव्हळे, सौ.भुलंगे, सौरभ माळवे, धनंजय भुलंगे, सुदिप कदम,महाले परीवार  आदी उपस्थित होते.
निलेश यांनी आजपर्यंत तीन राज्य साँफ्टबाँल स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय शालेय टेनिस व्हाँलीबाँल सुर्वण पदक प्राप्त केले.
सदर खेळाडूस क्रीडा विभाग प्रमुख प्रा.नागेश कान्हेकर,डी.डी.सोन्नेकर, गणेश माळवे, सतिश नावाडे, प्रंशात नाईक, प्रा.प्रसेनजित बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
ह्या उज्वल यशा बदल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम्. लोया उपाध्यक्ष अँड. वसंतराव खारकर चिटणीस डी.के.देशपांडे सहसचिव डॉ. व्ही. के.कोठेकर सहसचिव श्री .जयप्रकाशजी बिहाणी, जिल्हाक्रीडाधिकारी सी.व्ही. साखरे,प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रा.यादव गायकवाड, राज्य सचिव डॉ. प्रदीप तळवलकर, पर्यवेक्षक एल.एच.काळे, प्रा. रंमाकांत बनसोडे, प्रा.के.के.कदम,   तसेच प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यानी अभिनंदन केले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें