- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 12 जनवरी 2018

आंतरशालेय स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
सेलू / प्रतिनिधी
येथील भा.शि.प्र.संस्था अंबाजोगाई संचलित ,स्वामी विवेकानंद विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त दरवर्षी आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.या वर्षी दि.९ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे बक्षिस वितरण दि.१२ जानेवारी (शुक्रवार) रोजी करण्यात आले.तसेच ग्रंथालय विभागातर्फे इयत्तानुसार घेण्यात येणाऱ्या उत्कृष्ट वाचक पुरस्काराचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. हरिभाऊ चौधरी ,प्रमुख पाहुणे श्री गौतमराव सूर्यवंशी उपस्थित होते.श्री .किरणराव डुघरेकर ,श्री. सुधीरराव चौधरी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
दि.९ जानेवारी (मंगळवार) रोजी इयत्ता ५ वी तील विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीवर आधारीत सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत चि. यश मुकुंद देवढे ( प्रथम - नुतन विद्यालय ), चि. व्यंकटेश अरविंद कुलकर्णी ( प्रथम - स्वामी विवेकानंद विद्यालय ) ,चि. यज्ञेश राजेश देवढे ( द्वितीय - नुतन विद्यालय ) ,कु.आर्या माणिक रोडगे ( द्वितीय - ज्ञानतीर्थ विद्यालय ), चि. सुमेध महेंद्र देशमुख ( द्वितीय - स्वामी विवेकानंद विद्यालय ) ,कु.इरा मोहन खापरखुंटीकर ( तृतीय - नुतन कन्या प्रशाला)यांनी यश मिळवले .
दि.१० जानेवारी ( बुधवार ) रोजी इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीवर आधारीत सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली यात कु.अनुष्का अनिल कौसडीकर ( प्रथम - नुतन कन्या प्रशाला ) ,चि. अनिश उपेंद्र बेलूरकर ( द्वितीय - नुतन विद्यालय ),कु.सायली भीमराव मोगरे ( तृतीय - नुतन कन्या प्रशाला ) ,चि. आदित्य श्रीकिशन कोल्हे ( तृतीय - नुतन विद्यालय ) यांनी पारितोषिक पटकावले .
इयत्ता ६ वी तील विध्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली.यात कु.तृप्ती बळीराम धरणे ( प्रथम - स्वामी विवेकानंद विद्यालय ) ,कु.क्षितिजा रवी अंभोरे ( द्वितीय - के.बा. विद्यालय ) ,कु.मनाली मंगेश कुलकर्णी ( तृतीय - के.बा. विद्यालय ) यांनी यश मिळवले.
दि.११ जानेवारी ( गुरुवार ) रोजी इयत्ता ७ वी तील विध्यार्थ्यांसाठी * विवेकानंद एक व्यक्तिवेध *( जीवन व कार्य ) याविषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली कु.मधुरा योगेंद्र नांदापुरकर ( प्रथम - नुतन कन्या प्रशाला ) ,कु.अंजली किशोर डोंबरे ( द्वितीय - नुतन कन्या प्रशाला ) ,कु.श्रीकृपा किरणराव डुघरेकर ( तृतीय - स्वामी विवेकानंद विद्यालय ) यांनी यश संपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय चौधरी ,प्रास्ताविक विनोद मंडलिक ,यादीवाचन दीपाली भावसार यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर राऊत ,चेतन नाईक ,सतीश भुजबळ ,संध्या शोभने ,आश्विनी धामणगावकर ,उज्वला धर्माधिकारी, सेवक दत्ता गिरी यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें