- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 12 जनवरी 2018

जिजाऊ जन्मोत्सव ही फक्त जयंती नसुन हा एक भारतीय सण.(अजय बोराडे सिल्लोड तालुका प्रतिनिधी )

आज दि.१२ जानेवारी २०१८ रोजी रायझिंग स्टार इंग्लिश स्कुल गोळेगाव तर्फे ऐतिहासिक जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची भुमीका साकारलेल्या प्रतीकृतींनी हजारो लोकांच्या मनात जागा निर्माण केली.
माॅंसाहेबांचा जन्मोत्सव हा समाजाला दिशा दाखवु शकतो हे आज रायझिंग स्टार इंग्लिश स्कुलने सिध्द केले.डि.जे.,४ घोडे,शिवाजी महाराज ,राजमाता जिजाऊ,शेकडो मावळे,भगव्या पताका घेऊन ५०० विद्यार्थी,तसेच हजारो जनसमुदायासोबत महारॅली काढण्यात आली.जय जिजाऊ जय शिवराय,जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी गोळेगाव दणादुण गेले.गोळेगाव चौफुली वरती हजारोंच्या उपस्थितीत जिजाऊ वंदना घेण्यात आली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी नमन व जगदंब या गाण्यांवरती बहारदार नृत्य सादर केले.तसेच ही रॅली ग्रामसंसद कार्यालयावर नेण्यात आली व ग्रामसंसद कार्यालयावर जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला गणेश किसन बनकर (जि.प.सदस्य),अनिल खरात ( प.सदस्य)राजेंद्र धनवई (सरपंच),भास्कर पा.बनकर(उपसरपंच),गणेश पा. बनकर (तं.मु.अध्यक्ष) गणेश पा बनकर ,अनिल बनकर , जुबेर शहा,अरविंद मुरकुटे ,नितीन दौड, राजू गाढेकर, संतोष पंडित, अरुण पा बनकर,अजिंठा पोलीस स्टेशनचे शेकडे साहेब,जोशी साहेब,जाधव साहेब, संस्थापक सचिव अंबादास शिंदे .संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे पाटील शेकडो मावळे,हजारो नागरिक उपस्थित होते.या जन्मोत्सवाची सर्वत्र चर्चा होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें