नूतन विद्यालयात क्रीडा महोत्सव प्रारंभ.
सेलू ( शमशेर खान )येथे नूतन विद्यालयात वार्षिक स्नेह संमलेन निमित्ताने,दि.10 जाने, रोजी क्रीडा महोत्सवा चे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. हंनुमंत नखाते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी संस्थाध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक के.व्ही. वाघमारे, उपमुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, अशोक गाजरे, मा.मा.सुर्वे, उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवात मैदानी स्पर्धा, बुध्दीबळ, कबड्डी,व्हाँलीबाँल, खो-खो, टेनिस व्हाँलीबाँल, रस्सीखेच, या विविध स्पर्धा चे आयोजन दि.10 ते 13 जाने. दरम्यान करण्यात येणार आहे.
स्वागत गीत गणेश माळवे यांनी रचले " खेल खेलंगे देश शान बढागे" हे गीत संगीत शिक्षक सचिदान्नंद डाखोरे व संच यांनी सादर केले.
या प्रंसगी क्रीडा ज्योत राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील पदक प्राप्त चि. तेजस फाटे, अपुर्व कुलकर्णी, अनुराग आंबटी, यांच्या हस्ते पाहुण्यांनी प्रज्वलित केली, या नंतर खेळाडूंना शपथ देण्यात आली.
डॉ. नखाते म्हणाले की, विद्यार्थ्यांना आंतर शालेय क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो, यातून भावी उद्यमुखी खेळाडू तयार होतात. विद्यार्थ्यांनी नियमितपणे मैदानावर खेळत राहवे, आपले निरोगी आरोग्य घडवावे,
कार्यक्रम चे प्रास्ताविक डी.डी.सोन्नेकर, सुत्रसंचालन गणेश माळवे, तर आभार प्रदर्शन सतिश नावाडे यांनी मानले, याप्रसंगी प्रंशात नाईक, सौ, एन.डी.पाटील उपस्थित होत्या.
सेलू येथील नूतन विद्यालयात क्रीडा महोत्सव चे उद्घाटन प्रंसगी क्रीडा ज्योत प्रज्वलित करतांना डॉ. हंनुमंत नखाते, डॉ. एस.एम.लोया, के.व्ही. वाघमारे, अनिल कुलकर्णी, अशोक गाजरे, मा.मा.सुर्वे, डी. डी. सोन्नेकर, गणेश माळवे, सतिश नावाडे, प्रंशात नाईक, राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू, तेजस फाटे, अपुर्व कुलकर्णी, अनुराग आंबटी,
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें